अभिनेत्री रेखाने घेतली अमिताभ बच्चन यांच्या नातीची किस, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

ऐश्वर्या राय(Aishwarya Rai) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खाजगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोईंग बघायला मिळते.

अभिनेत्री रेखाने घेतली अमिताभ बच्चन यांच्या नातीची किस, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) चे लग्न राधिका मर्चंट (Radhika Marchant) हिच्यासोबत झाले. हे लग्न मुंबई येथे झाले. या लग्नाला फक्त देशातूनच नव्हे तर विदेशातूनही लोक मोठ्या प्रमाणावर दाखल झाले. तसेच अनेक बॉलिवूड कलाकारांनीही लग्नात हजेरी लावली. आता या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

ऐश्वर्या राय(Aishwarya Rai) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खाजगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोईंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिच्या खाजगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये वाद सुरूं असल्याचे सांगितले जात आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे घटस्फोट घेणार असल्याची सातत्याने चर्चा होत आहे. ऐश्वर्या राय हिने बच्चन कुटुंबियांचे घर सोडल्याचेही सांगितले जाते.

ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या हिच्यासोबत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला पोहोचली होती. यावेळी जबरदस्त लूकमध्ये ऐश्वर्या राय दिसत होती. यासोबतच सर्वांच्या नजरा या आराध्या हिच्यावर देखील होत्या. आराध्या देखील जबरदस्त अशा लूकमध्ये अनंत अंबानींच्या लग्नात पोहोचली. त्यांच्या या लूकचे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. तसेच सोशल मीडियावर एक तुफान व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन यांना गळा भेटून त्यांची पप्पी घेताना रेखा दिसत आहेत. अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे किस्से तर सर्वांनाच माहिती आहेत. मात्र, जया बच्चन आणि अमिताभ बच्चन हे रेखा यांच्यापासून दूर होतात. दुसरीकडे ऐश्वर्या राय हिला भेटल्यावर गप्पा मारताना रेखा दिसत आहे. अशातच आता अनंत अंबानींच्या लग्नात यांची भेट झाली. यावेळी रेखा यांनी ऐश्वर्या राय हिच्या लूकचे कौतुक केले आणि गळाभेट घेतली. रेखा यांनी त्यानंतर अमिताभ बच्चन यांची नात आराध्या हिला देखील पप्पी घेतली.

सोशल मीडियावर हाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करताना देखील दिसत आहेत. काहींनी या व्हिडिओवर कमेंट करत म्हटले की, ऐश्वर्या राय ही आपल्या सासूला अजिबात घाबरत नाही. ऐश्वर्या राय हिचे असेच सुरु राहिले तर संपत्तीमधील एकही हिस्सा जया बच्चन या ऐश्वर्या राय आणि तिच्या मुलीला देणार आहेत.

हे ही वाचा:

 

बालगायक जयेश खरे च्या आवाजातील “मन विठ्ठल विठ्ठल गाई” गाण्यात चमकला बालकलाकार साईराज केंद्रे

Anant – radhika Wedding : राधिका अनंत अंबांनी यांच्या शाही लग्नसराईवर मराठी अभिनेत्याची मार्मिक पोस्ट

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version