अभिनेत्री तेजस्विनी पंडितने केला तिच्या आयुष्यातील धक्कादायक खुलासा

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Actress Tejaswini Pandit) तिच्या आयुष्यामधील एक धक्कादायक खुलासा केला आहे. मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये तेजस्विनी पंडितचं नावही आवर्जून घेतलं जातं

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने केला तिच्या आयुष्यातील धक्कादायक खुलासा

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Actress Tejaswini Pandit) तिच्या आयुष्यामधील एक धक्कादायक खुलासा केला आहे. मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये तेजस्विनी पंडितचं नावही आवर्जून घेतलं जातं. मराठी चित्रपटांमध्ये तिने साकारलेल्या भूमिकाही प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरल्या. आता तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तिची ‘अथांग’ ही वेबसीरिज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या वेबसीरिजनिमित्त दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तेजस्विनीने एक धक्कादायक खुलासा केला.

मुलाखती दरम्यान अभिनेत्री तेजस्विनी पंडित म्हणाली, “मी घरभाडं द्यायला गेले आणि त्या व्यक्तीने मला थेट ऑफर केली. २००९ व २०१० च्या दरम्यान ही घटना घडली. त्याने जेव्हा मला ऑफर केली त्याक्षणी माझ्या समोर फक्त एक पाण्याचा ग्लास होता. मी तेच ग्लासातलं पाणी त्या व्यक्तीच्या तोंडावर फेकलं. मी अशा गोष्टी करायला येथे आली नाही. अन्यथा मी भाड्याने राहिले नसते. कलाक्षेत्रामध्ये मला अशाच पद्धतीने पैसे कमवायचे असते तर मी गाड्या, घर असं काय काय खरेदी केलं असतं. तुमची परिस्थिती तसेच तुम्ही कलाक्षेत्रात काम करत आहात हे पाहून तुम्हाला अशाप्रकारच्या गोष्टी विचारल्या जातात.” अशा अनेक प्रसंगांनी खूप काही शिकवलं असंही तेजस्विनीने यावेळी सांगितलं.

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडितला ओळखले जाते. अनेक चित्रपट, मालिका, वेबसीरिज या मनोरंजनाच्या विविध माध्यमांत हटके भूमिका साकारत तेजस्विनीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तिच्या या भूमिकांचे प्रचंड कौतुकही झाले. तेजस्विनीने आता निर्माती क्षेत्रात पदार्पण केले आहे. ‘अथांग’ या गाजत असलेल्या मराठी वेबसीरिजच्या माध्यमातून सध्या ती चर्चेत आहे.

हे ही वाचा : 

श्रद्धा वाळकर हत्या प्रकरणात मोठी उपडेट, सापडलेली हाडे वडिलांच्या डीएनएशी जुळली

सीमावादावर गृहमंत्री अमित शाह काय करणार?

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version