spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या अडचणीत वाढ, तहसीलदारांने बजावली ‘या’ प्रकरणात थेट नोटीस

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची सून आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) या मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. सिन्नर तहसीलदारांनी (Sinnar Tehsildar) नोटीस बजावली आहे. सिन्नरमधील जमिनीचा २२ हजार रुपयांचा कर थकवल्याप्रकरणी (tax evasion) तिला ही नोटीस बजावण्यात आली आहे. सिन्नरमधील ठणगावजवळ आडवाडीच्या डोंगराळ भागात ऐश्वर्याची सुमारे १ हेक्टर २२ आर जमीन आहे. याच जमिनीचं एक वर्षाचं कर ऐश्वर्याने थकवल्याची माहिती समोर येत आहे. ऐश्वर्यासोबतच इतरही १२०० मालमत्ता धारकांना कर थकवल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत कर वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायला नुकतंच सिन्नर तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये अभिनेत्रीने तब्बल २२ हजारांचा कर थकवल्याचं म्हटलं आहे. अभिनेत्रीला हा कर नोटीस मिळाल्यापासून येत्या १० दिवसांच्या आत भरण्यास सांगितला आहे. अभिनेत्रीने असं न केल्यास अनुपालन कसूर झाल्याच्या कारणाने अभिनेत्रीविरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १७४अन्वये योग्य ती कारवाई करण्यात येईल असे नोटिशीत सांगण्यात आलं आहे.

मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत कर वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाने (Department of Revenue) कारवाईचा धडाका लावला आहे. ऐश्वर्या राय बच्चनसोबत बाराशे थकीत अकृषक मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. आयटीसी मराठा लिमिटेड ,हॉटेल लीला वेंचर ,बलवेल रिसॉर्ट, कुकरेजा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, एअर कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड, मिटकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, छोटा भाई पटेल कंपनी, राजस्थान गम प्रायव्हेट लिमिटेड अशा अनेक इतर कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे.

हे ही वाचा:

अर्जुन खोतकरांच्या जावयावर गुन्हा दाखल

‘धनुष्यबाण’ कोणाचा ? उरले फक्त काही तास…

राशी भविष्य, १७ जानेवारी २०२३, आजचा दिवस मैत्रीसाठी … 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss