Adhipurush चित्रपट करणार सर्व रेकॉर्डस् ब्रेक ? तब्बल… तिकिट्स प्रि-बुकिंगलाच विकल्या गेल्या .

आदिपुरुष हा सिनेमा अनेक कारणांसाठी चर्चेत होता. या सिनेमावर अनेक गोष्टींमुळे टीका करण्यात आली होती. सुरवातीच्या काळात प्रदर्शित झालेल्या टीजरच्या लो कॅलिटी ग्राफिक्स मुळे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

Adhipurush चित्रपट करणार सर्व रेकॉर्डस् ब्रेक ? तब्बल… तिकिट्स प्रि-बुकिंगलाच विकल्या गेल्या .

आदिपुरुष (Adhipurush ) या चित्रपट जाहीर होणार हे कळल्यापासूनच चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळाली. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर तर प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली. या सिनेमाच्या ट्रेलर वर चाहत्यांनी भरभरून लाईक्स चा वर्षाव केला. काहीच दिवसांपूर्वी चित्रपटातील गाणे हे प्रेक्षकांच्या भेटीला आले असून चाहत्यांनी या गाण्यांना आपलेसे केले आहे. येत्या १६ जूनला आदिपुरुष हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सिनेमाच्या ऍडव्हान्स बुकिंग साठी सुरवात झाली आहे. ऍडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात तिकीट विक्री झाली आहे.

आदिपुरुष हा सिनेमा अनेक कारणांसाठी चर्चेत होता. या सिनेमावर अनेक गोष्टींमुळे टीका करण्यात आली होती. सुरवातीच्या काळात प्रदर्शित झालेल्या टीजरच्या लो कॅलिटी ग्राफिक्स मुळे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. परंतु ट्रेलर रिलीज झाल्या नंतर या सिनेमाने सर्वांचेच मन जिंकून घेतले. या सिनेमाच्या ट्रेलरने सर्वांनाच वेड लावले. नुकतेच या सिनेमाची पूर्व तिकीट विक्री सुरु झाली आहे. पूर्व तिकीट विक्रीच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाचे चक्क ३६,००० पेक्षा अधिक तिकीटे विकले गेले आहेत.

११ जून पासून ‘आदिपुरुष’च्या ऍडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून . या सिनेमाचे पीवीआर (PVR), आयनॉक्स (INOX) आणि सिनेपोलिसचे (CINEPOLIS) मिळून एकूण ३६,००० तिकिटे विकले गेले आहेत. म्हणूनच ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रिलीज च्या पहिल्याच दिवशी १०० कोटींची कमाई करणार असल्याचे वर्तवले जात आहे. तसेच फक्त हिंदी वर्जनमधून हा सिनेमा १. ४० कोटींची कमाई करू शकतो, असे सुद्धा म्हटले जात आहे.

आदिपुरुष या चित्रपटाची निमिर्ती भूषण कुमार (Bhushan Kumar) तसेच दिग्दर्शन हे ओम राऊत (Om Raut) यांनी केले आहे. या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास (Prabhas) हा प्रमुख भूमिकेत आहे. तसेच अभिनेत्री क्रिती सनोन (Kriti Sanon) देखील प्रमुख भूमिका साकारत आहे. या सिनेमात मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे (Devdutt Nage) सुद्धा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रेक्षकांना या सिनेमाची भयंकर उत्सुकता लागली आहे. हा सिनेमा कोण कोणते रेकॉर्ड्स ब्रेक करेल हे पाहण्याचे ठरेल.

हे ही वाचा:

BCCI कडे कर्णधार पदासाठी हे तीन नवे पर्याय

EXCLUSIVE INTERVIEW : महाराष्ट्राच्या राजकारणात चक्रीवादळ आणणारी Sanjay Raut यांची तुफानी मुलाखत!

शिंदे गट आणि भाजपमध्ये खटके उडण्यास सुरवात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version