काठमांडूमध्ये Adipurush चित्रपटावर बंदी

सध्या मनोरंजन क्षेत्रातील चर्चेचा विषय म्हणजेच 'आदिपुरुष' (Adipurush) आणि या चित्रपटावरून भारतामध्ये अनेक वाद पाहायला मिळाला.

काठमांडूमध्ये Adipurush चित्रपटावर बंदी

सध्या मनोरंजन क्षेत्रातील चर्चेचा विषय म्हणजेच ‘आदिपुरुष’ (Adipurush) आणि या चित्रपटावरून भारतामध्ये अनेक वाद पाहायला मिळाला. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटावरून नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये मोठा वाद सुरू आहे. १९ जून रोजी काठमांडूमध्ये सर्व हिंदी चित्रपटावर बंदी घालवण्यात आली आहे. आदिपुरुष या चित्रपटामध्ये सीतेचा उल्लेख हा भारत की बेटी असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे हा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह यांनी काठमांडू महानगर क्षेत्रातील सर्व हिंदी चित्रपटांवर बंदी घालण्याला पाठिंबा दिला आहे. यावर ते म्हणाले की, ‘आदिपुरुष’मधील तो संवाद न काढता चित्रपट प्रदर्शित केल्यास कधीच भरून न निघणारं नुकसान होईल’ असे काटमांडुचे महापौर म्हणाले.

पुढे बालेंद्र शाह म्हणाले की, आम्ही तीन दिवसांपूर्वीच याबद्दलची नोटीस पाठवली होती. चित्रपटातील सीतेबद्दलचा आक्षेपार्ह संवाद काढून टाकण्यासाठी आम्ही तीन दिवस दिले होते”, असं शाह म्हणाले. जर तो संवाद न काढता चित्रपट तसाच प्रदर्शित करण्याची परवानगी दिली तर ती तथ्यांशी छेडछाड होईल असे ते म्हणाले. आदिपुरुष या चित्रपटामध्ये ‘जानकी भारत की बेटी है’ हा संवाद अद्याप चित्रपटात तसाच असल्यामुळे आजपासून काठमांडूमध्ये सर्व हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे.

काठमांडूमधील १७ थिएटर्समध्ये सध्या प्रदर्शित होत असलेल्या सर्व हिंदी चित्रपटामधील प्रदर्शन थांबवण्यात आले आहे आणि शाह यांनी आदेश देखील देण्यात आले आहे. “केएमसीने जारी केलेल्या सूचनेनुसार सोमवारपासून काठमांडूमधील सर्व थिएटरमध्ये भारतीय चित्रपट दाखवणं बंद करणार आहेत”, असं केएमसीचे प्रवक्ते नवीन मानंधर यांनी सांगितलं.

हे ही वाचा:

अनुराग ठाकुर यांच्या भेटीदरम्यान कुस्तीपटूंनी केलेल्या मागणीच काय?

International Yoga Day निम्मित भाजपचा मेगा प्लॅन, पंतप्रधानसह अनेक नेते होणार सहभागी

‘Kon Honar crorepati’ मध्ये विशेष भागात दिसणार तीन यार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version