spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आदिपुरुष चित्रपट बदलण्यात येणार, निर्माते आणि दिग्दर्शकाचा निर्णय

बहुचर्चित आदिपुरुष या चित्रपटावर प्रेक्षकांनी जोरदार टीका केली. या चित्रपटामधील भाषा ही अत्यंत छपरी असल्याची टीका चित्रपट पाहून आलेल्या प्रेक्षकांनी केली आहे.

बहुचर्चित आदिपुरुष या चित्रपटावर प्रेक्षकांनी जोरदार टीका केली. या चित्रपटामधील भाषा ही अत्यंत छपरी असल्याची टीका चित्रपट पाहून आलेल्या प्रेक्षकांनी केली आहे. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट पाहिल्यानंतर रामायण कसं दाखवू नये याचं उदाहरण सादर केल्याची टीका अनेकांनी सोशल मीडियावर करायला सुरुवात केली. एवढेच नाही तर या चित्रपटामधील व्हिएफएक्स, रावण, प्रभू राम आणि हनुमान यांच्या वेशभूषेची खिल्ली उडवण्यात आली आहे.

चित्रपटामधील कलाकारांच्या डायलॉगमुळे निर्माते-दिग्दर्शक आणि लेखकाला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. या ट्रोलिंगनंतर अखेर त्यातील काही डायलॉग्स बदलणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोशल मीडियावरील प्रचंड ट्रोलिंगनंतर अखेर या चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी मोठा निर्णय घेतला आहे. या चित्रपटातील वादग्रस्त डायलॉग्स बदलण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. टी-सीरिजच्या अधिकृत प्रवक्त्याने याबाबतची माहिती दिली आहे. त्याचसोबत संवादलेखक मनोज मुंतशीर यांनीदेखील ट्विट करत डायलॉग्स बदलणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

 

मनोज मुंतशीर यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘मी आणि चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शकांनी ठरवलंय की जे संवाद तुम्हाला खटकले आहेत, त्याविषयी आम्ही अभ्यास करू आणि या आठवड्यात सुधारित संवाद चित्रपटात समाविष्ट करू’, असं त्यांनी म्हटलंय. मात्र याच ट्विटमध्ये त्यांनी टीकाकारांवर नाराजी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

Sri Lanka विरुद्ध Pakistan कसोटी सामन्यामध्ये मिळाले २१ वर्षीय खेळाडूला स्थान

संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss