spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Adipurush Teaser Poster: आदिपुरुषचे फर्स्ट लूक पोस्टर समोर, रामच्या भूमिकेत दिसणार प्रभास

आरंभ. अयोध्या, यूपी मधील सरयू नदीच्या काठावर जादुई प्रवास सुरू करण्यासाठी आमच्यात सामील व्हा.

साऊथ सुपरस्टार प्रभास आणि बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन हे सध्या त्यांच्या बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून लोकांमध्ये उत्सुकतेचे कारण ठरत आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांची निराशा कमी करत निर्मात्यांनी चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केला आहे. समोर आलेल्या पोस्टरमध्ये अभिनेता प्रभास रामच्या भूमिकेत धनुष्य धरलेला दिसत आहे. त्याचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

चित्रपटाचा हा फर्स्ट लूक पोस्टर अभिनेता प्रभासने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवरदेखील शेअर केला आहे. निर्मात्यांनी पाच भाषांमध्ये चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केले आहे. पोस्टर शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले, आरंभ. अयोध्या, यूपी मधील सरयू नदीच्या काठावर जादुई प्रवास सुरू करण्यासाठी आमच्यात सामील व्हा. आमच्या आदिपुरुष चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि टीझर २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ०७:११ वाजता अयोध्येत अनावरण करणार. हा चित्रपट १२ जानेवारी २०२३ रोजी IMAX आणि 3D मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

Instagram वर ही पोस्ट पहा

 

Prabhas (@actorprabhas) ने सामायिक केलेली पोस्ट

हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या बिग बजेट चित्रपटाची प्रेक्षक खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत चित्रपटाचे पोस्टर समोर आल्यानंतर आता चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. याआधी या चित्रपटाचा टीझर उत्तर प्रदेशातील प्रभू रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या निर्मात्यांनी या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर २ ऑक्टोबर रोजी अयोध्येतील सरयू नदीच्या काठावर असलेल्या रामाच्या शहरात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

चित्रपटाबद्दल सांगायचे तर, आदिपुरुष हा रामायणापासून प्रेरित पौराणिक चित्रपट आहे. या चित्रपटात प्रभास भगवान रामाची म्हणजेच आदिपुरुषाची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहे. तर क्रिती सेनन सीतेची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात देवदत्त नागे यांनी हनुमानाची तर सनी सिंगने लक्ष्मणची भूमिका साकारली होती. पुढील वर्षी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हा चित्रपट १२ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हे ही वाचा:

‘गॉडफादर’ चा धमाकेदार ट्रेलर झाला रिलीज, साऊथ स्टार चिरंजीवी आणि सलमान खानमुळे उत्सुकता पोहोचली शिगेला

नेहा कक्करच्या रिमिक्स गाण्याच्या वादामुळे सोशल मीडियावर व्हायरल होतायत भन्नाट मिम्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss