या’ व्हिडिओमुळे ‘आदिपुरुष’ चित्रपटातील VFX आर्टिस्ट होत आहेत ट्रॉल; पहा काय आहे या व्हिडिओमध्ये

या’ व्हिडिओमुळे ‘आदिपुरुष’ चित्रपटातील VFX आर्टिस्ट होत आहेत ट्रॉल; पहा काय आहे या व्हिडिओमध्ये

काही दिवसांपासून एका VFX आर्टिस्टची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे . यात त्याने आदिपुरुष’मधील सैफचा ड्रॅगन सीन सारखा स्वतःचा ‘ड्रॅगन सीन’ तयार केला आहे. या व्हिडीओमुळे आदिपुरुष मधील VFX आर्टिस्टला ट्रोल केल जात आहे. ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच वादात अडकला आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या लुकला तर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. तसेच चित्रपटातील VFX आणि कलाकारांचा पेहराव यावर सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. तसेच या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. कारण आदिपुरुष चित्रपटातील कलाकारांचा लुक आणि चित्रपटातील पात्रांचा पेहराव यामुळे धार्मिक भावना दुखावल्याची टीका केली जात होती. म्हणून चित्रपटातील निर्मात्यांनी गोष्टींवर बदल करण्याचा निर्णय घेत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे.

एक VFX आर्टिस्टने सैफ अली खानचा आदिपुरुष चित्रपट पहिला. त्यानंतर या आर्टिस्टने चित्रपटातील सैफ अली खानचा एक सीन पाहिल्यानंतर स्वतःच्या कलाकृतीने ‘ड्रॅगन सीन’ तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने हा सीन कसा तयार केला हे देखील सांगितले आहे. नंतर तो सीन VFX मध्ये कसा दिसेल हे देखील दाखवले आहे. तर आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. VFX आर्टिस्टने शेअर केलेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाइक्स आणि कमेंट्सचा केला आहे. या व्हिडिओला पाहून एका नेटकऱ्याने कंमेंट बॉक्समध्ये असे लिहिले आहे की, ‘आदिपुरुष ट्रेलरपेक्षा हा व्हिडीओ चांगला आहे’. तर दुसऱ्या नेटकऱ्यांनी यावर ‘भाऊ VFX ज्या कलाकारांना बॉलीवूडने भाड्याने घेतले आहे ते कोविड बॅचमध्ये पास झाले आहेत’. अशी मजेशीर कमेंट केली आहे. तसेच काही नेटकऱ्यांनी तर असेही लिहिले आहे की, ‘चित्रपटातील VFX टीमने फक्त स्वतःवर संपूर्ण पैसा खर्च केला आणि नंतर काही अँनिमेशन शिकणाऱ्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी प्रोजेक्ट किंवा काहीतरी म्हणून बनवण्यास सांगितले असावे’ असे म्हणत आदिपुरुष चित्रपटावर टोला लगावला आहे.

आदिपुरुष चित्रपट १२ जानेवारी २०२३ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटात सैफ अली खान, प्रभास हे मुख्यभूमीकेत असून देवदत्त नागे, कृति सैनॉन देखील असणार आहेत .

राहुल गांधींच्या शेगावच्या सभेला उद्धव ठाकरेंची पाठ ?; उद्धव ठाकरे म्हणाले, सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याशी …

Exit mobile version