१६ जून होणार ‘Adipurusha’ प्रदर्शित, चित्रपटाचा दुसरा ट्रेलर लाँच

बहुप्रतीक्षित चित्रपट आणि साऊथ चित्रपटांचा सुपरस्टार प्रभास याचा नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. आदिपुरुष या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा सुरु आहे.

१६ जून होणार ‘Adipurusha’ प्रदर्शित, चित्रपटाचा दुसरा ट्रेलर लाँच

बहुप्रतीक्षित चित्रपट आणि साऊथ चित्रपटांचा सुपरस्टार प्रभास याचा नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. आदिपुरुष या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि सर्वच हा ट्रेलर पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. टीझरमध्ये झालेल्या चुकांनंतर आता त्या चुका सुधारून चित्रपटाच्या दिग्दर्शक ओम राऊतने भन्नाट ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटामध्ये दमदार व्हिएफएक्स, म्युझिक, खिळवून ठेवणारे शॉट्स पाहून रामायणामध्ये हरवून गेल्यासारखे वाटत आहे.

आता या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे. ऍक्शनने भरलेल्या या दुसऱ्या ट्रेलरने पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. हा चित्रपट १६ जून ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत त्यामुळे आता चित्रपट प्रेमींना १६ जूनची प्रतीक्षा लागली आहे. मोठया पडद्यावर जबरदस्त व्हिएफएक्स सह रामायणाची कथा दाखवणारा ‘आदिपुरुष’ ची सगळीकडेच चर्चा आहे. चित्रपटाचा ऍक्शन ट्रेलर बघण्यासाठी हजारो प्रेक्षक तिरुपतीला जमा झाले आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर तिरुपतीला लाँच झाला आहे. हा ऍक्शन ट्रेलर २ मिनिटे २४ सेकंदांचा आहे. यामध्ये साधूच्या वेशात आलेल्या रावणाची झलक दिसणार आहे.

ट्रेलरमध्ये वानरसेना श्रीरामाच्या बाजूने जे युद्ध होत आहे त्याचा सुद्धा भाग दाखवण्यात आला आहे. न्यायालयाच्या दोन पायांमधील अन्यायाचा नाश करण्यासाठी जानकीला आणि अधर्माचा विनाश करण्यासाठी मी येत आहे या प्रभासच्या डायलॉगने अंगावर शहारे येत आहेत. ‘आदिपुरुष’चा हा नवीन ट्रेलर रामभक्तीमध्ये हरवणारा आहे. सर्व प्रेक्षक आता हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ‘आदिपुरुष’ १६ जून रोजी हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड अशा ५ भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

हे ही वाचा:

नवी मुंबईत घ्या Tirupati Balajiचं दर्शन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं मंदिराचं भूमिपूजन

बारावीनंतर नाही तर दहावीनंतर करता येतील हे Diploma; जाणून घ्या सविस्तर

डाळ भात खाऊन आलाय कंटाळा ? मग बनवा घरच्या घरी हॉटेल स्टाईल Dal Khichadi

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version