शाळेतल्या मुलांसाठी Adipurush चा स्पेशल शो, तब्ब्ल ६,२०० स्क्रीन्सवर सिनेमा प्रदर्शित!

आदिपुरुष या चित्रपटाची निमिर्ती भूषण कुमार (Bhushan Kumar) तसेच दिग्दर्शन हे ओम राऊत (Om Raut) यांनी केले आहे.

शाळेतल्या मुलांसाठी Adipurush चा स्पेशल शो, तब्ब्ल ६,२०० स्क्रीन्सवर सिनेमा प्रदर्शित!

ज्या सिनेमाची प्रेक्षकांना ट्रेलर रिलीज पासून प्रचंड उत्सुकता होती तो ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपट आज चाहत्यांच्या भेटीस आला आहे. हा चित्रपट रामायणावर आधारित असल्यामुळे चाहते या सिनेमाची प्रचंड वाट बघत होते. अभिनेता प्रभास (Prabhas) आणि क्रिती सनोन (Kriti Sanon) या सिनेमात मुख्य भूमिका साकारत आहेत. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या ऍडव्हान्स बुकिंगमध्येच एक लाखापेक्षा अधिक तिकीटांची विक्री झाली होती.

जगभरातील चित्रपटप्रेमी आता ‘आदिपुरुष’ हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ‘आदिपुरुष’ हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तब्बल ६,२०० स्क्रीन्सवर २ डी आणि ३ डीमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा सिनेमा १०० कोटींचा टप्पा पार करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘आदिपुरुष’ सिनेमाची जगभरातील सिनेप्रेमींमध्ये चांगलीच क्रेझ आहे. ढोल-ताशांचा गजरात चाहते ‘आदिपुरुष’ सिनेमाचं स्वागत करत आहेत. अनेक ठिकाणी शाळेतल्या मुलांना ‘आदिपुरुष’ सिनेमा दाखवण्यात येत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक शिक्षिका हनुमानाची मूर्ती घेऊन सिनेमागृहात एन्ट्री करत असून नंतर ती एका खूर्चीवर ती मूर्ती ठेवत आहे.

आदिपुरुष या चित्रपटाची निमिर्ती भूषण कुमार (Bhushan Kumar) तसेच दिग्दर्शन हे ओम राऊत (Om Raut) यांनी केले आहे. या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास (Prabhas) हा प्रमुख भूमिकेत आहे. तसेच अभिनेत्री क्रिती सनोन (Kriti Sanon) देखील प्रमुख भूमिका साकारत आहे. या सिनेमात मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे (Devdutt Nage) सुद्धा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रेक्षकांना या सिनेमाची भयंकर उत्सुकता लागली आहे. हा सिनेमा कोण कोणते रेकॉर्ड्स ब्रेक करेल हे पाहण्याचे ठरेल.

हे ही वाचा:

देशाचे बळ आणखीन वाढणार, लवकरच भारताकडे येणार घातक ड्रोन!

Shravan 2023, यंदा श्रावण महिना वाढणार… जाणून घ्या सविस्तर

Ajit Pawar यांनी शिंदे-फडणवीस सरकार खडेबोल सुनावले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version