पठाण चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू, परदेशातील सर्व चित्रपटगृहे हाऊसफुल्ल

त्यानंतर अनेक संघटनांनी या चित्रपटावर आक्षेप घेत बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. नुकतेच सेन्सॉर बोर्डानेही चित्रपटात आवश्यक बदल करण्याचे आदेश दिले आहेत.

पठाण चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू, परदेशातील सर्व चित्रपटगृहे हाऊसफुल्ल

शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाबाबत गदारोळ निर्माण झाला असून पठाण चित्रपटातील एक गाणे काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले होते. ‘बेशरम रंग’ हे या गाण्याचे नाव असून या चित्रपटातील अभिनेत्री दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे या चित्रपटाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. लोकांनी चित्रपटाबाबत अनेक मीम्सही बनवले. त्यानंतर अनेक संघटनांनी या चित्रपटावर आक्षेप घेत बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. नुकतेच सेन्सॉर बोर्डानेही चित्रपटात आवश्यक बदल करण्याचे आदेश दिले आहेत. एवढे सगळे करूनही चित्रपटाचे आगाऊ बुकिंग सुरू झाले आहे आणि परदेशात या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

वृत्तांवर विश्वास ठेवला तर शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने जर्मनीत रेकॉर्डब्रेक बुकिंग केले आहे. तिथे शोच्या पहिल्या दिवशीचे सर्व शो हाऊसफुल्ल जात आहेत. यावरून हे स्पष्ट झाले आहे कि शाहरुख जागतिक स्टार का मानले जाते. त्याची फॅन फॉलोइंग फक्त भारतात नसून जगभर आहे. या चित्रपटाने जर्मनीमध्ये आगाऊ बुकिंग करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होण्यापूर्वीच इतका जबरदस्त प्रतिसाद मिळणे ही त्याच्या निर्मात्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

रिपोर्ट्सनुसार, पठाण चित्रपटाची आगाऊ बुकिंग २८ डिसेंबरपासून जर्मनीमध्ये सुरू झाली होती. ज्यामध्ये चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवशीच्या सर्व शोचे आगाऊ बुकिंग हाऊसफुल्ल आहे. हा प्रतिसाद पाहून या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या चित्रपटाबाबत सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना ‘पठाण’मध्ये आवश्यक बदल करून तो रिलीजपूर्वी सादर करण्यास सांगितले आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यासोबतच काही सीन्सही चित्रपटातून काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पठाण हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

हे ही वाचा:

हनी सिंगचा धक्कादायक खुलासा, म्हणाला मी दिवसरात्र मरणाची वाट पहायचो

तुनिशा शर्माच्या आरोपांवर शिझानच्या बहिणींचं प्रतिउत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version