हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा विक्रम वेधा हा चित्रपट या महिन्याच्या ३० तारखेला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. हा पुष्कर-गायत्री चित्रपट याच नावाच्या साऊथ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. नुकताच या चित्रपटाला सोशल मीडियावर बहिष्काराला सामोरे जावे लागले होते पण आता चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची आगाऊ बुकिंग सुरु झाली आहे.
ज्या वेगाने चित्रपटाची तिकिटे आगाऊ विकली जात आहेत, त्यानुसार हा आकडा ६ – ८ कोटींपर्यंत पोहोचू शकतो, असे मानले जात आहे. मात्र, हा आकडा ब्रह्मास्त्राइतका चांगला नसेल, असे वृत्तांत सांगितले जात आहे. Sacnilk पोर्टलनुसार, चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच १७ लाखांहून अधिक कमाई केली आहे. आतापर्यंत ४,७०० हून अधिक तिकिटे विकली गेली आहेत आणि संख्या सतत वाढत आहे.महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्रपट रिलीज व्हायला अजून ५ दिवस बाकी आहेत.
३० सप्टेंबर रोजी रिलीज होणाऱ्या या चित्रपटात हृतिक रोशन एका गँगस्टरच्या भूमिकेत आहे, तर सैफ अली खान एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे . काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ट्रेलर रिलीज होताच त्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. चाहत्यांनी हृतिक-सैफ दोघांचेही जोरदार कौतुक केले. अॅक्शन-थ्रिलरने भरलेला हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. या चित्रपटात राधिका आपटे मुख्य भूमिकेत असून ती सैफच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.
१७५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या विक्रम वेधा या चित्रपटाचा सोशल मीडिया ट्रेंड पाहता हा चित्रपट ओपनिंगच्या दिवशी २० कोटींहून अधिक कमाई करू शकतो असे ट्रेड अॅनालिस्टचे म्हणणे आहे. या चित्रपटातील हृतिक रोशनचा लूक खूपच वेगळा आहे आणि चाहत्यांना तो खूप आवडला आहे. आर माधवन आणि विजय सेतुपती दाक्षिणात्य विक्रम वेधा चित्रपटात मुख्य भूमिकेत होते आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.
हे ही वाचा:
आलिया भट्टचा हॉलिवूड पदार्पण; हार्ट ऑफ स्टोनचा फर्स्ट लुक झाला रिलीज
राणा नायडूचा टीझर झाला रिलीज, सिनेसृष्टीतील सुपरस्टार काका – पुतण्या येणार आमने – सामने
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा