BTS मेंबर Suga आणि J-Hope नंतर आता RM ने सुद्धा स्पोटिफायवर ओलांडला १ अब्ज स्ट्रीम क्रेडिट्सचा टप्पा

अखेर तो त्याच्या ग्रुपमधील रॅपलाइन (rapline) सदस्य Suga आणि J-Hope यांच्यामध्ये सामील झाला.

BTS मेंबर Suga आणि J-Hope नंतर आता RM ने सुद्धा स्पोटिफायवर ओलांडला १ अब्ज स्ट्रीम क्रेडिट्सचा टप्पा

२१ डिसेंबर रोजी, BTS ‘ RM ने एक नवीन यश संपादन केले कारण त्याने स्पोटिफायवर (Spotify) सर्व क्रेडिट्समध्ये १ अब्ज स्ट्रीम पार केले आणि अखेर तो त्याच्या ग्रुपमधील रॅपलाइन (rapline) सदस्य Suga आणि J-Hope यांच्यामध्ये सामील झाला. त्याने अलीकडेच अनेक कलाकारांच्या सहयोगी ट्रॅकसह इंडिगो ( Indigo) नावाचा त्याचा पहिला एकल अल्बम (Solo Album) रिलीज केला, ज्यामुळे चाहत्यांना ऐकण्यासाठी अनेक नवीन आणि मजेदार एकाच अल्बममध्ये उपलब्ध झाली आहेत.

अलीकडेच, RM एका मुलाखतीसाठी एका दक्षिण कोरियाच्या न्यूज शोमध्ये हजर झाला आणि इंडिगो ( Indigo) ते जिनच्या लिस्टिंगपर्यंत विविध गोष्टींबद्दल तो बोलला. जिनच्या आर्मी लिस्टिंगबद्दल विचारले असता, तो म्हणाला की त्यांची नोंदणी म्हणजे एका पर्वाचा शेवट आणि दुसऱ्या पर्वाची सुरुवात आहे.जी बीटीएसच्या (BTS) यशासाठी कारणीभूत आहे. त्यांच्या पदार्पणापासून अमेरिकन संगीत क्षेत्रात वर्चस्व निर्माण करण्यापर्यंत ती दिसून येते. किंबहुना, त्याआधी, बीटीएसच्या सात सदस्यांचे सोलो अल्बम जोरदारपणे सुरू झाले आणि जे-होपच्या (J-Hope) नेतृत्वाखाली जंगकूक (Jungkook), जिन (Jin) आणि आरएम (RM) यांनी एकामागून एक नवीन अल्बम किंवा नवीन गाणी रिलीज केली.

इंडिगो :

‘इंडिगो’ ( Indigo) शीर्षकाबद्दल बोलताना तो म्हणाला, २०१८ मधील दुसऱ्या मिक्सटेप ‘मोनो’च्या (Mono) उलट हा अल्बम आहे, तो म्हणाला की २०१५ ते २०१८ पर्यंत, जेव्हा ‘मोनो’ (Mono) हा अल्बम तयार केला गेला, तेव्हा त्याला अक्रोमॅटिक कपडे घालण्याची आवड होती आणि त्याने दोन्ही टोकांचा खूप विचार केला, परंतु त्यानंतर त्याने जीवनशैली बदलली आणि तो नैसर्गिक बर्‍याच गोष्टी स्वीकारु लागला. त्यानंतर तो अनेकदा रंगीत कपडे आणि जीन्स घालू लागला आणि तो त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा बदल होता. (मोनोक्रोमॅटिक) ‘मोनो’ ते ‘इंडिगो’ पर्यंत निळ्या आणि नैसर्गिकतेसह बदलांची मालिका दोन भागांच्या अल्बमच्या स्वरूपात त्याला प्रकट करायची होती म्हणून त्याने ह्या दोन अल्बमची निर्मिती केली.

RM त्याच्या ग्रुपबद्दल काय म्हणाला?

या अल्बममध्ये RM, जागतिक सुपरस्टार समूह BTSचा प्रमुख आणि किम नामजून, यांच्या बद्दल बोलताना तो म्हणाला की, ‘जो मुकुट घालतो, त्यालाच वजन सहन करावे लागते’ या वाक्याप्रमाणे बीटीएसचा मुकुट खूप जड आणि वेदनादायक आहे, परंतु तो खूप धन्य आहे. मुकुट जड असल्याने तक्रार करण्यापेक्षा आणि कठीण वेळ येण्याऐवजी, त्याने हे नशीब स्वेच्छेने स्वीकारले आहे आणि तो आता त्याला सामोरे जाणार आहे.

हे ही वाचा:

“शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी विमा कंपन्यांकडून १०० रुपयांचा धनादेश देणे लाजीरवाणे”

सिद्धिविनायक मंदिरात आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करत मनसेचा मोर्चा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version