आपल्या ड्रेससिंगमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे उर्फी जावेद (Uorfi Javed) नेहमीच चर्चेत असते. तसेच ती घालत असलेले वेगवेगळ्या प्रकारचे कपडे सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात. तसेच तिच्या कपड्यांमुळे या पूर्वी अनेकदा नेटकऱ्यांकडून देखील ट्रोल झाली आहे. तिच्या याच कपड्यांमुळे नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच उर्फी हि वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बर उर्फी हि काही पहिल्यांदा वादात नाही अडकली. या आधी देखील ती अनेकदा वादात अडकली आहे. या आधी देखील उर्फीचे अनेक अक्टर्स, लेखक आणि डायरेक्त्तर यांच्या सोबत वाद झाले आहेत. परंतु उर्फी आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या निशाण्यावर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघींमध्ये सोशल मीडिया युद्ध सुरु आहे. आणि यांचे हे युद्ध रोज एक नवीन वळण घेत आहे.
उर्फी जावेदने आता चित्र वाघ याना पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या मार्फत रोख ठोक उत्तर हे दिले आहे. तिने इंस्टाग्राम वर स्टोरी शेअर केली आहे अंडी त्यात ती म्हणाली, ‘मला माहीत आहे की राजकारण्यांविरोधात असे पोस्ट अपलोड करणं खूप धोकादायक आहे. पण या लोकांमुळे माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत. एकतर मी स्वत:चा जीव तरी घेईन किंवा मग माझ्या मनातलं बोलेन आणि त्यांच्याद्वारे मारली जाईन. मात्र या सगळ्याची सुरुवात मी केली नाही. मी कधीच कोणासोबत काही चुकीचं केलं नाही. ही लोकं विनाकारण माझ्या मागे लागली आहेत’, असं उर्फीने लिहिलंय.
तसेच तिने आणखी एक पोस्ट केली आहे आणि त्यात ती म्हणाली आहे, ‘या त्याचं महिला आहेत ज्या राष्ट्रवादीत असताना संजय राठोडच्या अटकेसाठी ओरडत होत्या. यानंतर त्यांचा पती लाच घेताना पकडला गेला, त्यामुळे त्यांनी पतीला वाचवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर संजय आणि चित्रा हो दोघे खूप चांगले मित्र झाले. मी देखील भाजपमध्ये प्रवेश करते, मग आपण चांगले मित्र होऊ’ असं म्हणत उर्फीने चित्रा वाघ याना पुन्हा एकदा डिवचले आहे.
नेमके प्रकरण काय ?
२०२२ च्या अखेरीस चित्रा वाघ आणि उर्फी जावेद या दोघीच्या वादाला सुरवात झाली. चित्र वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवरून ३० डिसेंबर २०२२ मध्ये ट्विट केलं आहे त्या मध्ये त्यांनी उर्फीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्यात त्या त्यांनी उर्फी जावेदला तात्काळ बेड्या ठोकण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला उर्फीने देखील रोख ठोक उत्तर दिले. परंतु तिच्या उत्तरामुळे चित्रा वाघ या पुन्हा एकदा पेटून उठल्या आहे. आणि त्यांनी थेट मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेत त्यांना पत्र देऊन उर्फीच्या वीरोहात त्वरित कारवाई करावी अशी मागणी चित्र वाघ यांनी केली आहे. नवं वर्षात केलेल्या तक्रारीला उर्फीने देखील तिच्या अनोख्या अंदाजात पुन्हा एकदा उत्तर दिले आहे. आता त्यांच्या या वादात ठाकरे गटाच्या फायरब्रॅन्ड उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील उडी घेतली आहे. तर आता पुन्हा एकदा उर्फीने चित्रा वाघ याना डिवचलं आहे. आता हे सर्व प्रकरण काय वळण घेणार हे पाहणे नक्कीच महत्वाचे ठरेल.
हे ही वाचा:
उर्फीच्या वादात उडी घेतलेल्या सुषमा अंधारेंवर अप्रत्यक्षपणे चित्रा वाघ यांनी सोडले बाण
कपड्यांमुळे चित्रा वाघ यांच्या निशाणावर असलेली Uorfi Javed नक्की आहे तरी कोण ?