‘घर बंदूक बिरयानी’ नंतर नागराज मंजुळे झळकणार या सिनेमात

'घर बंदूक बिरयानी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची नागराज मंजुळेंच्या चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. आता लोकसत्ताला दिलेल्या एका मुलाखतीत नागराज यांनी त्यांच्या येणाऱ्या सिनेमाबद्दल भाष्य केलं आहे.

‘घर बंदूक बिरयानी’ नंतर नागराज मंजुळे झळकणार या सिनेमात

‘घर बंदूक बिरयानी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची नागराज मंजुळेंच्या चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. आता लोकसत्ताला दिलेल्या एका मुलाखतीत नागराज यांनी त्यांच्या येणाऱ्या सिनेमाबद्दल भाष्य केलं आहे. ‘घर बंदूक बिरयानी’ सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान दिलेल्या मुलाखतीत नागराज मंजुळे म्हणाले, ‘घर बंदूक बिरयानी’ नंतर मी आणखी एका सिनेमामध्ये झळकणार आहे. फ्रेम असं या सिनेमाचं नाव आहे. या चित्रपटामध्ये मी अमेय वाढ सोबत स्क्रीन शेयर केली आहे. आजपर्यंत मी अनेक सिनेमामध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या होत्या परंतु दिग्दर्शक-निर्माता हे जास्त चांगलं आहे” असे नागराज म्हणाला.

नागराजच्या ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहेच परंतु आता फ्रेम या सिनेमामध्ये देखील ते आतुरतेने वाट पाहत आहे. नागराज आणि अमेय वाघची जोडी काय धुमाकूळ घालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या चित्रपटामध्ये देखील प्रेक्षकांचे मनोरंजन होणार आहे. ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटात सयाजी शिंदे, नागराज पोपटराव मंजुळे, आकाश ठोसर आणि सायली पाटील हे प्रमुख भूमिकेत असले तरी असेही काही कलाकार आहेत ज्यांच्या अभिनय शैलीने ही बिर्याणी अधिकच लज्जतदार बनली आहे. ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांतील कलाकारांनी काम केलं आहे.

‘घर बंदूक बिरयानी’ या सिनेमातील कलाकारांबद्दल बोलताना नागराज मंजुळे म्हणाले, “घर बंदूक बिरयानी’ या सिनेमातील सर्वच कलाकार खूप मेहनती आहेत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामधून हे कलाकार असल्यामुळे प्रत्येकाची एक वेगळी शैली आहे. त्यामुळे बिर्याणी अधिकच चविष्ट होणार आहे. येत्या ७ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे बिर्याणी रुचकर बनवण्यासाठी त्यात विविध जिन्नस वापरले जातात, ज्याची प्रत्येकाची एक खासियत असते. तशीच खासियत असलेले महाराष्ट्रातील कलाकार ‘घर बंदूक बिरयानी’ मध्ये दिसणार आहेत.

हे ही वाचा : 

अरबी समुद्रातील संशयास्पद बोटीचा पाकिस्तानी कनेक्शन नसल्याचा दावा

Ram Navmi 2023, ठाण्यातील ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर राम मंदिरात रामनवमीचा जल्लोष

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version