मनोरंजन : कंगना राणौतच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर यांचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या चित्रपटात ते लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच ‘धाकड’ या चित्रपटात दिसल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आता आणखी एका चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. कंगनाचा हा चित्रपट भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत लागू करण्यात आलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. ज्यामध्ये कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकतेच कंगनाने या चित्रपटाचे पोस्टर व झलक शेअर केली. चाहत्यांनी तिच्या नवीन चित्रपटातील लूक आणि अभिनयाचे खूप कौतुक ही केले.
हेही वाचा
म्हणूनच बायकांना ‘हुशार’ म्हणतात, नवऱ्याला मूर्ख बनवुन…
आज या चित्रपटाचे आणखी एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर लोकनायक जय प्रकाश नारायणच्या भूमिकेत दिसत आहेत. खुद्द अनुपम खेर यांनी ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली. अनुपम खेर यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिले, एका निडर राजकारण्याची भूमिका साकारताना मला खूप आनंद होत आहे.
BIG: Happy and proud to essay the role of the man who questioned fearlessly, a rebel in the truest sense of the word, #JayaPrakashNarayan in #KanganaRanaut starrer and directorial next #Emergency. My 527th! Jai Ho! 👍😬🇮🇳 #JP #Loknayak pic.twitter.com/V0FDCA86UP
— Anupam Kher (@AnupamPKher) July 22, 2022
‘इमर्जन्सी’ हा कंगना राणौत दिग्दर्शित दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी तिने मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 14 जुलै रोजी कंगनाने चित्रपटातील तिचा पहिला लूक शेअर केला. ज्यामध्ये ती हुबेहूब माजी पंतप्रधान इंदिरा गांधींसारखी दिसत आहे. कंगनाच्या या लूकला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळवली. अनुपम खेर यांनीही चित्रपटाची झलक शेअर करत कंगनाचे कौतुक केले.
या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित होताच काँग्रेसने चित्रपटाला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. कंगना राणौत ही भाजपची एजंट असल्याचे म्हणत काँग्रेसने तिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दाखवण्याची मागणी केली आहे.