spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Lust Stories 2 नंतर आता विजय वर्मा Mirzapur 3 मध्ये घेणार दमदार एन्ट्री

मिर्झापूर ही करण अंशुमन दिग्दर्शित एका गुन्हेगारीवर आधारलेली अ‍ॅक्शन(Action) आणि थरारक(Thrilling) वेब सिरीज आहे. मिर्झापूरचे यापूर्वी २ सीजन झाले असून दोन्हीही सीजन खूप चर्चेत ठरले. प्रेक्षकांनी या सिरीजच्या दोन्हीही सीजनला भरभरुन प्रेम दिले.

मिर्झापूर ही करण अंशुमन दिग्दर्शित एका गुन्हेगारीवर आधारलेली अ‍ॅक्शन(Action) आणि थरारक(Thrilling) वेब सिरीज आहे. मिर्झापूरचे यापूर्वी २ सीजन झाले असून दोन्हीही सीजन खूप चर्चेत ठरले. प्रेक्षकांनी या सिरीजच्या दोन्हीही सीजनला भरभरुन प्रेम दिले. त्यातच आता याचा तिसरा सीजन लवकरच येत आहे. या वेबसीरिजच्या तिसऱ्या सीजनसाठी चाहते फार उत्सुक आहेत. या वेबसिरीजच्या तिसऱ्या सीजनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

या सिरिजची शुटिंग पुर्ण झाली असुन आता त्याचे पोस्ट प्रोडक्शनचे(Post production) काम सुरु आहे. आता त्यातच या सिरिजबाबत आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.ती म्हणजे या सिरिजमध्ये पुन्हा विजय वर्माचा सहभाग झाला आहे. विजय वर्माने ‘मिर्झापूर ३’ संदर्भात सोशल मीडियावर(Social media) एक पोस्ट शेअर केली आहे.या पोस्टमध्ये तो डबिंग स्टुडिओमध्ये(dubbing studio) मॉनिटरसमोर उभा आहे. विजय वर्मा यांनी फोटोवर लिहिलयं की, “डबिंग किया हैं, तैयार, MS 3”. विजय चित्रपटाच्या डबिंगच्या(dubbing) कामात व्यस्त आहे. त्याची पोस्ट पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

‘मिर्झापूर ३’मध्ये पंकज त्रिपाठी, दिव्येंदू शर्मा, विक्रांत मॅसी, अली फजल, राजेश तैलंग, रसिका दुग्गल, हर्षित शेखर गौंड, श्वेता त्रिपाठी, अंजुम शर्मा, शीबा चड्ढा, अमित सियाल आणि मनु ऋषी, विजय वर्मा यांसारखे कलाकार दिसणार आहेत.विजय वर्मा त्याच्या प्रोफेशनल लाइफपासून त्याच्या पर्सनल लाइफपर्यंत फार चर्चेत आहे.नुकतीच त्याची ‘लस्ट स्टोरीज २’ वेब सिरिज प्रदर्शित झाली असून त्याचे या वेब सिरिजसाठी खूप कौतुक करण्यात आले. त्यातच आता तो मिर्झापूर ३ मध्ये दिसणार आहे. दरम्यान ‘मिर्झापूर ३’ ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान Amazon प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम(stream) होऊ शकतो.

हे ही वाचा:

शरद पवारांच निवडणूक आयोगाला पत्र, पक्षाच्या चिन्हावर दावा केल्याची माहिती का दिली नाही?

भाजपकडून शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न? शिंदे-फडणवीस यांची रंगली तब्ब्ल एक तास बैठक…

Chandrayan Launch, ‘या’ दिवशी अवकाशात झेप घेणार Chandrayan 3

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss