रणवीर सिंगनंतर अजून एका अभिनेत्याने केलं न्यूड फोटोशूट…

‘वेल, जोईनिंग ट्रेंड’ असं कॅप्शन देत त्याने हे फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

रणवीर सिंगनंतर अजून एका अभिनेत्याने केलं न्यूड फोटोशूट…

हल्लीच रणवीर सिंगने एका मॅगझिनसाठी केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे तो एक चर्चेचा विषय बनला होता. त्यांच्या या फोटोशूटवर लोकांकडून मिश्र प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत होत्या. काहींनी त्याच्या या धाडसाचं कौतुक केलं तर काहींनी त्या ट्रोलदेखील केलं. पण, रणवीर सिंगचं न्यूड फोटोशूटचं हे प्रकरण शांत होतंय ना होतंय तोपर्यंत रणवीर सिंगच्या पाऊलावर पाऊल टाकत अजून एका अभिनेत्याने हा न्यूड फोटोशूटचा ट्रेंड फॉलो केलेला दिसतोय आणि तो अभिनेता म्हणजे तामिळ स्टार विष्णू विशाल.

रणवीर सिंगनंतर आता विष्णू विशालचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विष्णू विशाल हा एक प्रसिद्ध तामिळ अभिनेता असून त्याचे लग्न जागतिक ख्यातीची बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टा हिच्याशी लग्न झाले आहे. विष्णू विशालने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनुसार त्याच्या पत्नीनेच त्याचे हे फोटो क्लिक केले आहेत असं समजतं. विष्णू विशालने केलेलं हे फोटोशूट सेमी न्यूड फोटशूट आहे. या फोटोत पोझ देताना त्याने अंगावर पांढरी चादर घेतली आहे.

‘वेल, जोईनिंग ट्रेंड’ असं कॅप्शन देत त्याने हे फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. दरम्यान, अभिनेता विष्णू विशालने न्यूड फोटोशूटचा ट्रेंड फॉलो करणं त्यांच्या चाहत्यांना फारसं काही आवडलेलं दिसत नाहीये. त्याने फोटो टाकताक्षणी त्याला अनेकांनी ट्रोल केलं. काही चाहत्यांनी हे फोटो डिलीट करण्याची मागणी केली तर काहींनी त्याला अनफॉलो करण्याची कमेंट केली. या फोटोमुळे विष्णू विशालची प्रतिमा खराब होत असल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.

 

Exit mobile version