ब्रह्मास्त्र’च्या यशानंतर रणबीर कपूर ‘या’ अभिनेत्रीसोबत पहिल्यांदाच झळकणार

दोन वर्षांचा निर्बंधानंतर हिंदी चित्रपटामध्ये ब्रह्मास्त्र या चित्रपटाने भरपूर कमाई केली आहे.

ब्रह्मास्त्र’च्या यशानंतर रणबीर कपूर ‘या’ अभिनेत्रीसोबत पहिल्यांदाच झळकणार

दोन वर्षांचा निर्बंधानंतर हिंदी चित्रपटामध्ये ब्रह्मास्त्र या चित्रपटाने भरपूर कमाई केली आहे. अभिनेता रणबीर कपूर ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. प्रत्येक चित्रपटामध्ये विविध किरदार करत असल्याने रणबीर कपूरला नवीन नवीन चित्रपटासाठी ऑफर येत आहे. ब्रह्मास्त्र’ च्या यशानंतर रणबीर कपूर पहिल्यांदाच अभिनेत्री अनन्या पांडे सोबत पडद्यावर झळकणार आहे.

हे ही वाचा :बिग बॉस १६ च्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

 

अनन्या आणि रणबीर एका म्युच्युअल शूट लोकेशनवर आल्याचे दिसले. या नवीन जोडीला चित्रपटात एकत्र काम करताना पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अनन्या पांडे ही बॉलीवूड मधील प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री आहे. नुकतीच ती लायनर या चित्रपटाचा माध्यमातून प्रेक्षकांचा भेटीला आली आहे. तर आता ती रणबीर कपूर सोबत काम करताना दिसणार आहे. अनन्या हिने नुकताच एक सोशल मिडीयावर रणबीर सोबत एक पोस्ट शेर केली आहे. ही पोस्ट शेअर करत असताना नवीन चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. असे दिसून येते. आणि त्या पोस्ट खाली तिने असे लिहिले आहे की “नवा दिवस, नवीन शूट, माझा सर्वात आवडता अभिनेता, बेस्ट फ्रेंड.” याचबरोबर ‘फ्रेंड अस्त्र’ असा हॅशटॅगही तिने दिला आहे.

हे ही वाचा :

ललित प्रभाकरच्या ‘सनी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

 

Exit mobile version