विवेक अग्निहोत्रींनी पठाण चित्रपटातील ‘या’ गाण्याच्या केलेल्या टिपण्णीवर, शाहरुखचे चाहते झाले नाराज

विवेक अग्निहोत्रींनी पठाण चित्रपटातील ‘या’ गाण्याच्या केलेल्या टिपण्णीवर, शाहरुखचे चाहते झाले नाराज

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे कायम चर्चेत असतात.विवेक अग्निहोत्री हे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. विवेक अग्निहोत्री हे प्रत्येक विषयांवर बोलताना आढळतात. तर आता विवेक अग्निहोत्री यांनी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या पठाण (Pathaan) या आगामी चित्रपटा मधील नुकताच रिलीज झालेल्या गाण्यावर टिपण्णी केली आहे. यावर बॉलीवूड बादशाह शाहरुख खानचे चाहते विवेक अग्निहोत्री यांच्यावर नाराज झाले आहेत.

बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा पठाण या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज झाल्या पासूनच हा चित्रपट चर्चेत आहे. त्यानंतर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतरही या चित्रपटात वापरले गेलेले व्यूजवल इफेक्ट (VFX) हे अत्यंत खराब असल्याचे सांगितलं जात होत. पठाणच्या ट्रेलरमधील एका सिन मध्ये शाहरुख त्याच्या पाठीवर एक फॅन्सी एअरजेट घालून इमारतीच्या बाजूने उडताना दाखवला आहे. हा फॅन्सी एअरजेट हॉलिवूड चित्रपटात वापरण्यात आला होत आणि त्याची कॉपी पठाण चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये वापरण्यात आल्याचे सांगितले जात होते. बॉलीवूड स्टार शाहरुख खानाने तब्बल ४ वर्षांनंतर पठाण चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन केला आहे. त्यामुळे शाहरुखचे चाहते हे अत्यंत आनंदी आहेत.

नुकतच पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं रिलीज झालं आहे. आणि या गाण्यावर ‘द कश्मीर फाइल्स’ फेम चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून टिपण्णी केली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट मध्ये लिहिलं आहे की “पूर्वी इन्स्टा रील बॉलीवूड गाण्यांच्या खराब प्रतींप्रमाणे दिसत होत्या आणि आता बॉलीवूड गाणी इन्स्टा रीलच्या खराब प्रतींप्रमाणे दिसतात.” विवेक अग्निहोत्रींच्या या टिपण्णीवर अभिनेता शाहरुख खानचे चाहते नाराज झाले आहेत. शाहरुख खानच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया देत ट्विट केले आहे की अग्निहोत्री यांना एका जुन्या ट्विटची आठवण करून दिली. ‘ज्यात त्याने शाहरुख खानला सुपरस्टार असे वर्णन करून लिहिले होते.’ तर सल्ला देताना एका यूजरने लिहिले – भाऊ, सर्व काहीफारच वाईट आहे.’

पठाण या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिका साकारत आहे आणि त्याच्या बरोबर दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हे ही वाचा : 

दादरमधील सिद्धिविनायक मंदिर राहणार ५ दिवस बंद

Har Har Mahadev झी मराठी वाहिनीला स्वराज्य संघटनेचा अखेरचा इशारा, वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करण्यास नकार

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version