Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai : सासू-सुनेच्या भांडणाचा नवा अंक; ‘अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

नाटक, सिनेमे, वेबसीरिज कितीही आल्या तरी छोट्या पडद्याची गंमत निराळी आहे. सध्या वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

Aga Aga Sunbai Kay Mhanta Sasubai : सासू-सुनेच्या भांडणाचा नवा अंक; ‘अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

नाटक, सिनेमे, वेबसीरिज कितीही आल्या तरी छोट्या पडद्याची गंमत निराळी आहे. सध्या वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. छोट्या पडद्यावरील टीआरपीच्या स्पर्धेमध्ये अनेक वर्षांपासून अव्वल असणारी झी मराठी गेल्या काही वर्षांत पिछाडीवर पडलेली दिसत आहे. टीआरपीची ही गणितं स्टार प्रवाह वाहिनीनं यशस्वीरित्या खेळत स्पर्धेत आघाडी घेतली आहे. आता टीआरपीच्या या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी झी मराठीनं कंबर कसली आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून झी मराठीवरून काही नवीन मालिका सुरू झाल्या आहेत. आता पुन्हा दोन नवीन मालिका सुरू करण्याची घोषणा वाहिनीनं केली आहे.

रविवारी झी मराठीनं दोन नव्या मालिकांची (Zee Marathi New Serial) घोषणा केली. यापैकी एक मालिका लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित ‘लोकमान्य’ ही आहे. तर दुसरी मालिका सासू-सुनेच्या नात्यावर आधारीत ‘अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई’ ही आहे. आजच्या आधुनिक काळात, सासू-सूने मधील नातं, एकमेकींशी कधी भांडत तर कधी एकमेकींना चिमटे काढत कसं बहरत जातं, याचा धमाल प्रवास ‘अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे. तुझं माझं जमेना आणि तुझ्या विना करमेना, असं हे दोघी मधलं नातं वेगेवगळ्या प्रसंगातून धमाल उडवत असताना त्यांच्या सासू सुनेच्या नात्यावर सासऱ्यांची खुमासदार टिप्पणी त्या नात्याचे विविध पैलू उलगडून दाखवते. ह्या मालिकेत खट्याळ सासूच्या भूमिकेत जेष्ठ अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी (Sukanya kulkarni) असणार आहेत तर खोडकर सून साकारतेय स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar).

सासू सुनेच्या नात्यामध्ये येणारे तीढे विनोदी ढंगाने सोडवत हसत खेळत जगताना त्यांच्यातल्या नात्याची वीण घट्ट होत जाते. घराघरात घडणाऱ्या सासू सूनांच्या भांडणाना विनोदाच्या आरशात बघण्याची संधी ही गोष्ट प्रेक्षकांना मिळवून देईल. तसेच बऱ्याच काळानंतर स्वानंदी आणि सुकन्या पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये दिसणार आहेत. त्या देखील सासू-सुनेच्या भूमिकेमध्ये. मालिकेचा जो प्रोमो वाहिनीनं शेअर केला आहे. त्यात तरी या दोघींची केमिस्ट्री छान वाटत आहे. आता मालिका सुरू झाल्यानंतर नेमकं यात काय असेल हे प्रेक्षकांना कळेलच. ‘अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई’ ही मालिका प्रेक्षकांना २१ नोव्हेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री १० वा. झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.

अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई
कुठे पाहू शकता? झी मराठी
कधी? २१ नोव्हेंबर
किती वाजता? रात्री १० वा.

हे ही वाचा : 

आजोबा, वडील किंवा काकांपासून जे संस्कार मिळाले, त्यामुळे मी अत्यंत हार्डकोअर, कट्टर मराठी आहे; राज ठाकरे

वरून सरदेसाईंच्या मनधरणीमुळे युवासेनेच्या ३५ पदाधिकाऱ्यांनी घेतलं राजीनामा माघे

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version