Aishwarya Rai – Abhishek Bachchan यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा, अमिताभ बच्चन यांनी शेअर केली लेकाबद्दल खास पोस्ट

अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला १७ वर्षे झाली आहेत. या जोडप्याने २० एप्रिल २००७ रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाची त्यावेळी सर्वाधिक चर्चा झाली होती. परंतु आता त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा देखील चांगल्याच रंगल्या आहेत.

Aishwarya Rai – Abhishek Bachchan यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा, अमिताभ बच्चन यांनी शेअर केली लेकाबद्दल खास पोस्ट

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन (Abhishek Bachchan and Aishwarya Rai Bachchan) यांच्यातील मतभेदाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. या जोडप्याचा घटस्फोट होत असल्याची अफवा सध्या पसरवली जात आहे. मात्र, दोघांनीही या बातम्यांवर अद्याप एकही प्रतिक्रिया दिलेली नाही. नुकत्याच पार पडलेल्या अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्याला ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबीयांच्या वेगवेगळ्या एण्ट्रीनेही नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. या जोडप्याच्या नात्यात सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या वारंवार येत आहेत. तसेच हे दोघेही लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या येत आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला १७ वर्षे झाली आहेत. या जोडप्याने २० एप्रिल २००७ रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाची त्यावेळी सर्वाधिक चर्चा झाली होती. परंतु आता त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा देखील चांगल्याच रंगल्या आहेत. अश्यातच नुकतंच बिग बी अमिताभ बच्चन यांनी लेखाबद्दल खास पोस्ट केली आहे.

अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय दिसतात. आपल्या चाहत्यांसाठी ते कायमच खास फोटो आणि व्हिडीओही शेअर करताना दिसतात. नुकताच अमिताभ बच्चन यांनी लेक अभिषेक बच्चन याला रिपोर्ट करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन हे लेकाचे काैतुक करताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांनी फोटो शेअर करत लिहिले की, अभिषेक तू खूप जास्त कूल आहेस…प्रेम आणि अजूनही बरेच काही…यासोबत बिग बी यांनी काही इमोजीही शेअर केले आहेत. आता अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहेत. लोक यावर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. तर या पोस्टवर चाहत्यांनीही भरपूर कमेंट केल्या आहेत. चाहत्यांनी अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर कमेंट करत अभिषेकचे कौतुक केले आहे. एका यूजरने ‘कीप इट अप’ असे लिहिले आहे. एकाने लिहिले की, ‘अभिषेक महान व्यक्तींपैकी एक आहे’. एका यूजरने लिहिले की, ‘लव्ह यू सर जी’. एका यूजरने अभिषेकला प्रेमळ मुलगा म्हटले आहे.

 

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा असतानाच आता अमिताभ बच्चन यांनी लेकाचे काैतुक करणारी पोस्ट शेअर केलीये. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होण्याचे कारण श्वेता बच्चन असल्याचेही सतत सांगितले जातंय. श्वेता बच्चन ही आपल्या दोन्ही मुलांसोबत जलसा या बंगल्यावरच राहते.

 
Exit mobile version