spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अनेक वर्षाच्या खंडानंतर ऐश्वर्या राय बच्चन यांचे मोठ्या पडद्यावर आगमन

ऐश्वर्या राय बच्चन यांनी २०१६ साली फेंनी खान या चित्रपटात काम केले होते त्यानंतर बरेच वर्ष ऐश्वर्या बच्चन या सिनेसृष्ठीच्या बाहेरच राहिल्या पण आता पुन्हा त्यांचे ‘पोन्नियिन सेल्वन १’ (Ponniyin Selvan:I) या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत आगमन झाले आहे. अभिनेता सरथ कुमारने आज ऐश्वर्या राय बच्चन याना मणिरत्नमच्या प्रसिद्ध चित्रपट पोन्नियिन सेल्वन च्या सेटवरील छायाचित्रासह तिच्या वाढदिवसानिमित्त ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत . या चित्रपटात, ऐश्वर्याची जोडी सरथ कुमारसोबत होती, ज्याने पेरिया पझुवेत्तैरियारी ही भूमिका साकारली होती.सरथ कुमारने तिच्या चित्रासोबत लिहिले, “या खास दिवशी तुम्हाला स्वर्गातुन सर्वोत्कृष्ट वर्षाव व्हावा , वाढदिवसाच्या शुभेच्छा #Aishwarya (sic).”

या चित्रपटात ऐश्वर्या दुहेरी भूमिकेत दिसली – नंदिनी आणि तिची मूक आई मंदाकिनी देवी. रिलीज झाल्यानंतर, प्रेक्षक आणि समीक्षक दोघेही ऐश्वर्याच्या अभिनयाने प्रभावित झाले. आज ऐश्वर्याचे अभिनंदन करताना,PS1 अरुलमोझिवर्मनने (पोनियिन सेल्वन) च्या सुरुवातीच्या जीवनाची कथा सांगितली , जो चोल सम्राट राजाराजा (९४७-१०१४) या चित्रपटात जयम रवी अरुलमोझिवर्मनच्या भूमिकेत आहेत तर विक्रम, कार्ती, त्रिशा आणि ऐश्वर्या राय बच्चन इतर मुख्य भूमिकेत होते.

PS१ नुकताच तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त कमाई करणारा तमिळ चित्रपट बनला आहे. एकूण कमाई २२५ कोटी. चौथ्या आठवड्याच्या शेवटी, चित्रपट राज्यातील सर्व घरांमध्ये जाणार आहे . गेल्या आठवड्यात चित्रपटासाठी आणखी स्क्रीन जोडण्यात आल्या. जागतिक स्तरावर या चित्रपटाने आतापर्यंत करोडो रुपयांहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाची ५०० कोटीपर्यंतची एकूण कमाई होण्याची शक्यता दर्शवली जात आहे .

मणिरत्नम यांनी अलीकडेच एका संभाषणात सांगितले होते की फ्रँचायझीचा दुसरा भाग पुढील सहा ते नऊ महिन्यांत थिएटरमध्ये प्रदर्शित होईल आणि टीम सध्या पोस्ट-प्रॉडक्शनच्या कामात व्यस्त आहे. PS1, ५०० करोड पेक्षा जास्त बजेटमध्येबनले गेले. १५० कोटी, ज्यामध्ये दुसरा भाग समाविष्ट आहे, आता रजनीकांतच्या २.० नंतर जागतिक स्तरावर दुसरा सर्वाधिक कमाई करणारा तमिळ चित्रपट आहे.

हे ही वाचा :

गुलाबभाऊ मला तीन महिन्यांचे बाळ म्हणत असतील तर बाळ जसा सर्व खोड्या करतो, त्या करण्याचा मला सर्व अधिकार आहे; सुषमा अंधारे

Kishori Pednekar : ‘कर नाही त्याला डर कशाला’, अडीच तासाच्या पोलीस चौकशीनंतर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया

गुलाबभाऊ मला तीन महिन्यांचे बाळ म्हणत असतील तर बाळ जसा सर्व खोड्या करतो, त्या करण्याचा मला सर्व अधिकार आहे; सुषमा अंधारे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss