spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

”पोन्नियन सेल्वन” मध्ये ऐश्वर्याचा लूक चर्चेत

बॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन  तिचा आगामी सिनेमा 'पोन्नियन सेल्वन'मुळे विशेष चर्चेत आहे. या सिनेमात ती कशी दिसणार याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती

बॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन  तिचा आगामी सिनेमा ‘पोन्नियन सेल्वन’मुळे विशेष चर्चेत आहे. या सिनेमात ती कशी दिसणार याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. सिनेमातील इतर काही कलाकारांचे लूक समोर आले होते, पण ऐश्वर्याचा लूकची चाहते वाट बघत होते.राणी नंदिनीच्या रुपात ऐश्वर्या कशी दिसणार हे आता उघड करण्यात आले आहे. ऐश्वर्याचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ऐश्वर्याच्या आधी चियान विक्रम  आणि कार्ती या दोघांचा सिनेमातील लूक समोर आला होता.

ऐश्वर्या दीर्घ काळानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. या सिनेमासाठी ऑस्कर विजेते संगीतकार एआर रहमान यांचे संगीत असणार आहे. हा एक ऐतिहासिक सिनेमा असल्याने रहमान या सिनेमाच्या संगीतासाठी जुन्या काळातील काही वाद्यांचा समावेश करतील अशी शक्यता आहे.अशी माहिती मिळते आहे की ‘पोन्नियन सेल्वन’मध्ये ऐश्वर्याचे पजूवूरची राणी नंदिनी हे पात्र बदला घेण्याच्या भूमिकेत दिसणार आहे. पोन्नियन सेल्वनमध्ये ऐश्वर्या देखील दोन वेगवेगळ्या अंदाजात दिसणार आहे.

मणीरत्नम दिग्दर्शित हा सिनेमा दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून तामिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत पाहता येणार आहे. ३० सप्टेंबर २०२२ रोजी सिनेमाचा पहिला भाग अर्थात PS1 प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चाहत्यांनी तिच्या या लूकचं कौतुक केलं आहे. काहींनी तिला ‘देवी’ म्हटलं आहे तर काहींनी ‘राणी’. ती या भूमिकेला न्याय देऊ शकेल अशीही प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.

Latest Posts

Don't Miss