अजय पूरकर करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण; जमदग्नीवत्स असं प्रॉडक्शन्स हाऊसच नाव

काल (१९ ऑगस्ट) जन्माष्टमीच्या मुहुर्तावर मी माझं प्रॉडक्शन हाउस म्हणजेच निर्मिती संस्था स्थापन केली आहे

अजय पूरकर करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण; जमदग्नीवत्स असं प्रॉडक्शन्स हाऊसच नाव

अजय पुरकर - जमदग्नीवत्स

गेली अनेक वर्षे विविध मालिका, चित्रपट आणि नाटकांमधील आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कलाकार म्हणजे अजय पुरकर. अभिनय आणि गायन या दोन्ही क्षेत्रात त्यांनी स्वतःच असं वेगळं स्थान निर्माण केल आहे. त्यांचा हल्लीच प्रदर्शित झालेला आणि शिवअष्टकाचा भाग असणारा सिनेमा ‘पावनखिंडने’ ५० कोटींची कमाई करत लोकांच्या मनात मराठी सिनेमांबद्दल पुन्हा एकदा प्रेम निर्माण केले. या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणाऱ्या अजय पुरकर यांनी इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर एक नवी घोषणा केली आहे.

त्यांच्या या घोषणेनुसार अजय यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. अभिनयाबरोबरच ते आता निर्मिती क्षेत्रातही काम करताना दिसतील. जमदग्नीवत्स प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेची त्यांनी स्थापना केली आहे. या संस्थेद्वारा नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका यांची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच विविध ओटीटी प्लॅटफॉर्मसाठीसुद्धा चित्रपट आणि मालिका यांची निर्मिती होणार आहे.

अजय म्हणाले, “गेली अनेक वर्ष रसिक प्रेक्षकांनी माझ्यावर माझ्या भूमिकांवर प्रेम केलं. त्याचीच पुण्याई आज माझ्या वाट्याला आली आहे. कित्येक दिवस एक कल्पना माझ्या डोक्यात होती. काल (१९ ऑगस्ट) जन्माष्टमीच्या मुहुर्तावर मी माझं प्रॉडक्शन हाउस म्हणजेच निर्मिती संस्था स्थापन केली आहे. जमदग्नीवत्स प्रॉडक्शन्स असं त्याचं नाव आहे. उत्तमोत्तम कलाकृती कशाप्रकारे प्रेक्षकांसमोर आणता येतील याचा विचार करणारी ही निर्मिती संस्था असेल. त्यासाठीच मी या संस्थेची स्थापना केली आहे.”

आपल्या मातीतील तरूण प्रतिभावान लेखक, दिग्दर्शक आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तंत्रज्ञ शोधून उच्च दर्जाचे मराठी चित्रपट तयार करणे, हा ‘जमदग्नीवत्स प्रॉडक्शन्स’चा प्रमुख हेतू आहे. या क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणार्‍या लेखकांनीही एसडब्ल्यूएमध्ये रजिस्टर्ड केलेल्या आपापल्या संहिता, या संस्थेकडे घेऊ जाव्यात, असे आवाहन पूरकर यांनी केले आहे. संस्थेतर्फे फक्त मराठी, हिंदी याच भाषांमधून निर्मिती न करता, इतर प्रमुख भारतीय भाषांमधूनही निर्मिती केली जाणार आहे.

हे ही वाचा:

ख्यातनाम पाकिस्तानी गायिका नय्यारा नूर यांचे ७१ व्या वर्षी निधन झाले

Exit mobile version