spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘तुमची एवढी सोन्यासारखी मुलगी’…लग्नापूर्वी अंजिक्यने मानले शिवानीच्या आई-बाबांचे आभार

अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांनी अचानक सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का देत  लग्नगाठ बांधत आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे.

या नवीन वर्षात अनेक मराठी कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत.तर नुकतच अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांनी अचानक सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का देत  लग्नगाठ बांधत आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे.

शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे यांची प्रेम कहाणी ही जगजाहिर होते.हे दोघं बरेच वर्ष एकमेकांना डेट करत होते. बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली असताना शिवानीने टिव्हीवरच अजिंक्यवरील प्रेमाची जाहिर कबुली दिली होती. तेव्हापासून चाहत्यांना या दोघांच्या लग्नाचे वेध लागलेले.

सुरुवातीला या दोघांच्या नात्याला घरच्यांचा पाठिंबा नव्हता मात्र हळुहळु सगळ काही सावरत अखेर दोघांचा ही शाही विवाह सोहळा पार पडलाच.३१ जानेवारीला दोघांच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाल्यावर चाहतेही खुश झाले. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे १ फेब्रुवारीला दोघांनी लग्न केले. या लग्नाला कुटुंबातील जवळचे व्यक्ती तसेच इंडस्ट्रीतील जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते.

सोशल मीडियावर अजिंक्य आणि शिवानीच्या लग्नाचे फोटो खूप व्हायरल होत आहेत. नुकताच या दोघांनी आपल्या लग्नातील काही गोड क्षणांचा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. व्हिडिओमध्ये दोघांच्या नवरदेव्याच्या एण्ट्रीपासून ते लग्नाच्या विधींपर्यंतची खास झलक पाहायला मिळते. यासर्वांत अजिंक्यच्या छोट्याशा भाषणाने लक्ष वेधून घेतलं. त्यात अजिंक्य म्हणाला की, “शिवानी माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा भाग आहे. ती जशी आहे तशी मला खूप गरजेची आहे आणि आता ती मला आयुष्यभर हवीये. थँक्यू थँक्यू… तुम्ही मला तुमची एवढी सोन्यासारखी मुलगी देत आहात.”असं म्हणत शिवानीच्या आई-वडिलांचे आभार मानले आहेत.या व्हिडिओला सिनेसृष्टीतील कलाकारांकडून तसचं चाहत्याकडून लाईक आणि कमेंट्स येत आहेत.

अजिंक्य सध्या छोट्या पडद्यावरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत अद्वैत ही भूमिका साकारत आहे.तर शिवानीचा झिम्मा २ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकुळ घातला.

हे ही वाचा:

Fashion Hacks : हे फॅशन टिप्स वापरा आणि करा स्वतःमध्ये थोडा बदल

‘ज्यांनी मारले नाकर्तेपणावर बाण’,….अमृता फडणवीसांनी उखाणा घेत विरोधकांवर साधला निशाणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss