Akshara Singh: लीक MMS वर अक्षरा सिंहने दिले स्पष्टीकरण, म्हणाली…

. या सर्व अभिनेत्रींनंतर आता भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहचा एमएमएस लीक झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.

Akshara Singh: लीक MMS वर अक्षरा सिंहने दिले स्पष्टीकरण, म्हणाली…

अभिनेत्री अंजली अरोडा (Anjali Aroda), हंसिका मोटवानी (Hansika Motwani), करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan), मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) आणि सोहा अली खान (Soha Ali Khan) या अभिनेत्रींचे यापूर्वी MMS लीक (MMS Leak) झाले होते आणि काही दिवसांपूर्वी ‘कच्चा बदाम’ या गाण्यावर डान्स करणारी अभिनेत्री अंजली अरोराचा एमएमएस लिक झाल्यामुळॆ चर्चांना चांगलेच उधाण आले होते.

या सर्व अभिनेत्रींनंतर आता भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहचा एमएमएस लीक झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नक्की अक्षराचाच आहे की नाही हे अजून स्पष्ट होणे बाकी आहे. अशातच हा व्हिडिओ पाहून काहीजण या व्हिडिओत दिसणारी मुलगी अभिनेत्री अक्षरा सिंहच असल्याचा दावा करत आहेत. तर, काहीजणांनी हा व्हिडिओ फेक असल्याचे देखील म्हटले आहे. या सर्वच चर्चांना उधाण आलेले असताना या विषयावर आपलं मौन सोडत अक्षरा सिंहने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

काय म्हणाली अक्षरा सिंह?

बॉलिवूड लाईफशी बोलताना अक्षरा सिंह म्हणाली, ‘कोणी काही पण बोलू द्या. मी अजून व्हिडिओ पाहिला नाही. मी व्हिडिओमध्ये दिसत आहे का? हे सर्व कोण करतंय माहीत नाही. आत्तातरी, मला काही फरक पडत नाही. ज्यांना जे करायचं त्यांनी ते करावे.’ अक्षरा सिंहनं स्पष्ट केलं आहे की अशा व्हिडिओंचा तिच्यावर काहीही परिणाम होणार नाही.

अक्षराचे प्रवक्ते रंजन सिन्हा यांनी याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एमएमएसमध्ये अक्षरा नसून तो फेक आहे. अक्षराची लोकप्रियता पाहता तिची प्रतिमा खराब करण्यासाठी हे सर्व करण्यात आले आहे. अक्षराने प्रचंड मेहनत करुन हे सर्व काही मिळवले आहे. त्यामुळे अनेकजण तिच्यावर जळतात असे रंजन म्हणाले.

पुढे या व्हिडिओबाबत बोलताना, “तो व्हिडीओ खोटा आहे. (Akshara Singh Private video) कोणीतरी एडिट करून त्या व्हिडीओमधील मुलीवर माझा चेहरा लावलाय. कृपया असे फेक व्हिडीओ व्हायरल करू नका” अशी विनंती देखील अक्षराने लोकांना केली आहे.

हे ही वाचा:

दसरा मेळाव्यावरुन BMC वर वाढला दबाव

पोलीस भरती झालीच पाहिजे, देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांची घोषणाबाजी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version