अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ अनोख्या पद्धतीत साजरा करतायत प्रजासत्ताक दिन,व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा आगामी 'बडे मियां छोटे मियां' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ अनोख्या पद्धतीत साजरा करतायत प्रजासत्ताक दिन,व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा आगामी ‘बडे मियां छोटे मियां’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.दरम्यान या सिनेमामुळे अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ चांगलेच चर्चेत आहेत.अक्षय आणि टायगर सध्या जॉर्डनमध्ये या चित्रपटाचं शूटिंग पुर्ण करत आहेत.तर आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अक्षय कुमारने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांनी जॉर्डनमध्ये अनोख्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे.’बडे मियां छोटे मियां’ या सिनेमात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ रुपेरी पडद्यावर जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहेत. त्यांच्या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. सिनेमा रिलीज होण्याआधी अक्षय आणि टायगरच्या जोडीची एक झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे.

अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये खिलाडीसोबत टायगर श्रॉफदेखील दिसून येत आहे. टायगर आणि अक्षय सध्या ‘बडे मियां छोटे मियां’ या सिनेमातील एका गाण्याचं जॉर्डनमध्ये शूटिंग करत आहेत. अक्षय आणि टायगर देशापासून दूर असले तरी त्यांची देशभक्ती मात्र कमी झालेली नाही. अक्षयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो आणि टायगर तिरंगा घेऊन समुद्रकिनाऱ्यावर पळताना दिसत आहेत.

अक्षयने खास पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,”नवा भारत, नवा आत्मविश्वास, नवी दृष्टी, आमची वेळ आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा, जय हिंद, जय भारत”. अक्षय-टायगरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरला झाला आहे. अक्षयच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटातील धमाकेदार अॅक्शन सीन्सची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. हॉलिवूडपटाप्रमाणे या सिनेमातील अॅक्शन सीन शूट करण्यात आले आहेत. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर, अलाया एफ, पृथ्वीराज सुकुमारन हे कलाकारही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अजय देवगनचा ‘मैदान’ आणि ‘बडे मिया छोटे मिया’ हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर आमने-सामने येऊ शकतात.त्यामुळे आता कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपलं वर्चस्व गाजवणार यावर आता लक्ष लागलं आहे.

हे ही वाचा:

७५ व्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर उत्तरप्रदेशच्या चित्ररथाने सगळ्यांचे लक्ष वेधले

प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधानासंदर्भात प्रबोधन करण्याची वेळ आली, जयंत पाटील

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version