अभिनेता अक्षय कुमार ठरला डीपफेक व्हिडिओचा शिकार, व्हिडिओ व्हायरल

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा नेहमी त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो,मात्र सध्या तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

अभिनेता अक्षय कुमार ठरला डीपफेक व्हिडिओचा शिकार, व्हिडिओ व्हायरल

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा नेहमी त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो,मात्र सध्या तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.बॉलीवूडचे वेगवेगळे कलाकार सध्या डीपफेक व्हिडिओचे शिकार होताना दिसून येत आहेत. या सगळ्याची सुरुवात प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिकापासून झाली होती.रश्मिकाचा तो डीपफेक व्हिडिओ खुप व्हायरल झाला आणि व्हिडिओ बनवणाऱ्या त्या आरोपीला अटक करत त्याबाबत कारवाई देखील करण्यात आली. रश्मिकानंतर आलिया, नोरा, प्रियंका चोप्रा, काजोल आणि कतरिना यांचे डीपफेक व्हिडिओ समोर आले होते.यानंतर सोनु सूद चा देखील डीपफेक व्हिडिओ बनवण्यात आला,त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देखील त्याचा सामना करावा लागला होता.

आता बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा त्याच्या डीपफेक व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.अक्षय कुमारचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये तो एका गेम अॅप्लिकेशनच्या बाबत माहिती देतो आहे. त्या गेम अॅप्लिकेशनचे तो प्रमोशन करताना दिसत आहे. त्यानंतर तो फेक व्हिडिओ असल्याचे लक्षात आले आहे.मात्र या व्हिडिओवर अक्षय कुमारने अद्यापही कोणतच भाष्य केलेलं नाही.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयनं कधीही अशाप्रकारे कोणत्याही अॅप्लिकेशनची जाहिरात केलेली नाही. त्या व्हिडिओचा मुळ स्त्रोत काय याची चौकशी केली जात आहे. अशाप्रकारे खोट्या जाहिरातीमधून प्रचार करुन अक्षयची प्रतिमा डावलन्याचा प्रयत्न असल्याचं दिसून येत आहे.त्यातून तातडीनं मार्ग काढण्यात यावेत. अशी मागणी यापूर्वी संबंधित प्रशासनाकडे करण्यात आले आहेत. फेक व्हिडिओ तयार केला आहे त्याच्यावर तातडीनं कारवाई करण्यात यावी. अशी मागणी अक्षयच्या टीमच्या वतीनं करण्यात आली आहे. बॉलीवूडमधील अनेक कलाकार हे आता डीपफेक व्हिडिओच्या जाळ्यात अडकत असल्याचं दिसून येत आहे.

हे ही वाचा:

यंदाच्या ‘व्हेलेंटाईन डे’ पार्टनरला गिफ्ट द्या ‘या’ खास भेटवस्तू

देशाच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी असणारे आडवाणी यांचे नेतृत्व आमच्यासाठी प्रेरणादायी – CM Eknath Shinde

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version