अक्षय कुमारचे मराठी चित्रपटात पदार्पण, चित्रपटात साकारणार ‘ही’ महत्वाची भूमिका

अक्षय कुमारचे मराठी चित्रपटात पदार्पण, चित्रपटात साकारणार ‘ही’ महत्वाची भूमिका

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. नुकताच अक्षय कुमारचा रामसेतू हा चित्रपट प्रकाशित झाला होता .या चित्रपटात त्याला पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणून दाखवण्यात आले आहे जो जुन्या संरचनेचे जतन करण्याच्या मोहिमेवर जातो. पण आता अक्षय कुमार हा पहिल्यांदाच मराठी चित्रपटामध्ये पदार्पण करणार आहे. अक्षय कुमार हा महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या आगामी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत .

या संदर्भात त्याने ट्विट केले आहे. त्याने ट्विट मध्ये लिहिले आहे कि “एवढी दिग्गज भूमिका साकारणे ही खरोखरच मोठी जबाबदारी आहे. ही भूमिका साकारताना मला खूप आनंद होत आहे. हे माझ्यासाठी स्वप्न सत्यात उतरल्यासारखे असेल . असे अक्षय कुमार याने ट्विट केले आहे त्याच बरोबर त्याने चित्रपटाचा ट्रेलर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असलेला स्वतःचा फोटो शेअर केला आहे.

काल मुंबईत महेश मांजरेकरांचा प्रवीण तरडे दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाचा शुभारंभ सोहळा पार पडला, या कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते.या कार्यक्रमात चित्रपटाचा चित्रपटातील शिवरायांच्या मावळ्याची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सत्कार करण्यात आला. त्यावेळी छत्रपती छत्रपती शिवजा महाराजांची भूमिका कोण साकारणार असा सवाल उपस्थित झाला. तेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेता अक्षयकुमार यांना व्यासपीठावर बोलावले आणि “वेडात मराठे वीर दौडले सात” या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अक्षय कुमार साकारणार असल्याचे उघड केले .

आपल्या मराठी पदार्पणाबद्दल बोलताना अक्षय या कार्यक्रमात म्हणाला, “हे माझ्यासाठी एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मोठ्या पडद्यावर साकारणे ही एक मोठी जबाबदारी आहे असे मला वाटते. जब राज सरांनी मला चित्रित करायला सांगितले तेव्हा मला धक्का बसला. ही भूमिका. ही भूमिका साकारताना मला खूप आनंद होत आहे आणि ही माझ्यासाठी स्वप्नवत असलेली भूमिका असेल. तसेच, मी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासोबत पहिल्यांदाच काम करणार आहे, आणि हा एक वेगळा अनुभव असणार आहे.” असे अक्षय कुमारने सांगितले
महेश मांजरेकर यांनी सांगितले कि या चित्रपटाचे वर्णन त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. ज्यासाठी ते गेली ७ वर्षे काम करत आहेत कारण त्यासाठी खूप संशोधन आवश्यक होते पुढे त्यांनी सांगितले की . “हा आजवरचा सर्वात मोठा आणि भव्य मराठी चित्रपट आहे आणि त्याच्या देशभरात प्रदर्शित झाल्यामुळे मला लोकांना सर्वात शक्तिशाली हिंदू राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांची कथा जाणून घ्यायची आहे. अक्षय कुमारला शिवाजी महाराजांच्या भूमिकेत सामील करून घेण्याची माझी खूप इच्छा आहे. , मला विश्वास आहे की तो या भूमिकेसाठी परिपूर्ण आहे,” असे ते म्हणाले .

कार्यक्रमाच्या शेवटी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, “हा चित्रपट सुपरहिट होईल, माझ्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत. बाळासाहेब ठाकरे मराठी चित्रपटांच्या पाठीशी उभे होते, राज ठाकरेही सिनेमाला सपोर्ट करत आहेत.”

हे ही वाचा :

सुषमा अंधारे यांचा मोठा दावा; शिंदे गटातील ‘हा’ आमदार आमच्या संपर्कात

Parambir Singh : परमबीर सिंह खंडणी प्रकरणातील निलंबित पोलीस पुन्हा सेवेत

खोके सामनामध्ये पोहोचले का? मनसेचा खोचक सवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version