अक्षय कुमारच्या OMG 2 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, सेन्सॉर बोर्डकडून चित्रपटात ‘हा’ बदल

सध्या अक्षय कुमारच्या ओह माय गॉड २ (Oh my god 2) चित्रपटाची खूप चर्चा होत असून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच आता या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

अक्षय कुमारच्या OMG 2 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, सेन्सॉर बोर्डकडून चित्रपटात ‘हा’ बदल

सध्या अक्षय कुमारच्या ओह माय गॉड २ (Oh my god 2) चित्रपटाची खूप चर्चा होत असून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच आता या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता चाहत्यांना होती. अखेर हा ट्रेलर रिलीज झाला असून भक्ताच्या आयुष्यातला अंधकार दूर करायला भगवान शंकर अवतार घेणार, अशी या चित्रपटाची रंजक कथा असल्याचे, यामधून दिसत आहे.

ओह माय गॉड २ (Oh my god 2) च्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते की, नंदी शिवशंकराला त्याच्या भक्तावर संकट आले आहे, हे सांगतोय. पुढे मग पंकज त्रिपाठींचे सर्वसामान्य कुटुंब दिसते. अचानक या कुटुंबावर एक संकट कोसळते आणि मग पंकज त्रिपाठी थेट कोर्टात केस दाखल करतात. पुढे पंकज त्रिपाठींच्या मदतीला भगवान शंकर अवतरतात. शंकराच्या भूमिकेत अक्षय कुमार असून, पुढे आपल्या भक्ताची मदत भगवान शंकर कसे करतात, याची संपूर्ण कहाणी ओएमजी २ चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

दरम्यान ओएमजी २ (OMG 2) गेल्या काही आठवड्यांपासून CBFC (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) च्या समस्यांमुळे चित्रपट चर्चेत होता. अखेर अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळाले आहे. अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम अभिनीत अमित राय दिग्दर्शित चित्रपटाला २ तास ३६ मिनिटांच्या रनटाइमसह ‘ए – फक्त प्रौढांसाठी’ (A – For Adults Only) प्रमाणपत्र देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे की, सेन्सॉरशिपच्या मुद्द्यांमुळे चित्रपटात अनेक कट केले जाणार आहेत. परंतु मिडीया वृत्तानुसार, चित्रपटात कोणताही कट होणार नाही. ओएमजी २ कोणताही कट न करता पास झाला आहे. चित्रपटात काही दृश्ये, संवाद आणि पात्रे आहेत, जी सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांशी चर्चा केल्यानंतर निर्मात्यांनी त्या दृश्यांमध्ये बदल केला आहे. दरम्यान आता बहुचर्चित ओएमजी (OMG 2) २ चित्रपट ११ ऑगस्टला थिएटर्समध्ये दाखल होणार आहे.

हे ही वाचा:

पिंपरी-चिंचवड पोलीस भरती घोटाळ्यामध्ये ‘बीडचे कनेक्शन’

गायक कार्तिकी गायकवाडची पतीसह Balli Trip, पाहा फोटोज

Crop Insurance Deadline, शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version