spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Alia Bhatt : आलियानं कशी साजरी केली लग्नानंतरची पहिली दिवाळी?

बॉलीवूडमध्ये सध्या जोरदार दिवाळी पार्ट्या रंगताना दिसत आहेत, ज्यामधनं बड्या बड्या सेलिब्रिटींची उपस्थिती लक्ष वेधून घेताना दिसत आहे. गेल्या आठवड्याभरात आयुषमान खुराना,तापसी पन्नू,एकता कपूर,अबू जानी,रमे तोरानी आणि आंनद पंडित यांच्यासोबत अनेकांनी दिवाळी पार्ट्यांचे आयोजन केले होते.

बॉलीवूडमध्ये सध्या जोरदार दिवाळी पार्ट्या रंगताना दिसत आहेत, ज्यामधनं बड्या बड्या सेलिब्रिटींची उपस्थिती लक्ष वेधून घेताना दिसत आहे. गेल्या आठवड्याभरात आयुषमान खुराना,तापसी पन्नू,एकता कपूर,अबू जानी,रमे तोरानी आणि आंनद पंडित यांच्यासोबत अनेकांनी दिवाळी पार्ट्यांचे आयोजन केले होते. अभिषेक बच्चन,ऐश्वर्या राय-बच्चन, करिष्मा कपूर, माधुरी दिक्षित,विकी कौशल,कतरिना कैफ,अक्षय कुमार,हृतिक रोशन असे बडे कलाकार या पार्ट्यांना उपस्थित राहिले होते. पण रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यापैकी कुठल्याच पार्टीत नजरेस पडले नाहीत.

आलिया आणि रणबीरसाठी यंदाची दिवाळी विशेष आहे, खासकरून आलिया भट्ट साठी. कारण या वर्षी बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकले नाहीत, पण आलिया भट्टचा गंगूबाई कठियावाड़ी (Gangubai Kathiawadi) आणि ब्रह्मास्त्र (Brahmāstra) या चित्रपटाने मात्र बॉक्स ऑफिसवर जादू केली. तसेच पहिल्यांदाच आलियाने रणबीरसोबत ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या माध्यमातून एकत्रित काम केलं. आलिया आणि रणबीरसाठी यंदाचं वर्ष आणखी एका कारणासाठी स्पेशल आहे. ते म्हणजे त्यांच्या घरी आता लहान पाहुण्याचं आगमन होणार आहे. म्हणूनच आलिया यंदाची दिवाळी दरवर्षीप्रमाणे धुमधडाक्यात साजरी करू शकत नाही. आता आलियानं इन्टाग्रामवर लेटेस्ट फोटो पोस्ट करत यामागचे कारण सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

 बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचे ७.१९ कोटी फॉलोअर्स आहेत. आलिया या वर्षी एप्रिल महिन्यात रणबीर कपूरसोबत लग्नबंधनात अडकली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून आलियाने गोड बातमी दिली होती.

लग्नानंतरची आलियाची ही पहिली दिवाळी आहे. त्यामुळे अर्थातच चाहत्यांना रणबीर आणि आलियाचे दिवाळी फोटो पाहण्याची उत्सुकता लागून राहिली होती,पण हे कपल कुठल्याच पार्टीत नजरेस पडलं नाही. आलियानं आता लेटेस्ट फोटो शेअर करत यामागचं कारण सांगितलं आहे. लवकरच रणबीर-आलिया आई-वडील होणार आहेत. त्यामुळे आलिया म्हणालीय,”यावर्षी माझी दिवाळी बेडवरच आराम करत मी साजरी करत आहे”.

आलियानं इन्स्टाग्रामवर २ फोटो शेअर केले आहेत. एक गेल्या वर्षीचा दिवाळीचा फोटो आहे,ज्यात तिनं निळ्या रंगाचा लहंगा परिधान केला आहे आणि हातात मेणबत्ती पकडलेली आहे. दुसऱ्या लेटेस्ट फोटोत तिनं कॅज्युअल टी-शर्ट परिधान केला आहे आणि ती बेडवर आराम करताना दिसत आहे. तिच्या मागे तिची कॅट अँडवर्ड आहे. आलियानं फोटो पोस्ट करत कॅप्शन दिलं आहे की,”शुभ दिपावली,एक गेल्या वर्षीचा फोटो आहे आणि एक आताचा फोटो आणि त्यातील मी,यंदा दिवाळी बेडवरच साजरी करत आहे”.

बाळाच्या जन्मानंतर आलिया भट्ट एका वर्षाचा ब्रेक घेणार आहे. आलिया भट्टने मॅटरनिटी लीव्हवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. बाळासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा यासाठी आलियाने हा निर्णय घेतला आहे. ब्रेकवर जाण्यासाठी आलियाने आगामी सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे.

हे ही वाचा :

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुण्यात अग्नी तांडव

‘मातोश्री’चा किल्ला भक्कम ; दिवाळीनिमित्त मातोश्री निवासस्थानी आदित्य ठाकरे किल्ला उभारण्यात रमले

Sitrang Cyclone : ‘सितरंग’ चक्रीवादळामुळे बांगलादेशात पाच बळी तर, भारतात अनेक राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss