spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आलिया आणि रणबीरच्या घरात येणार नवा पाहुणा; लग्नाच्या दोन महिन्यांतच आलियाने दिली गुडन्यूज

आलियाने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये तिच्यासोबत रणबीर कपूर  दिसत आहे. अल्ट्रासाऊंड करतानाचा हा फोटो तिने पोस्ट केला आहे.

लिवूड अभिनेत्री अलिया भट्ट नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहत असून ती तिचे अनेक फोटोज आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. आलिया ने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्ट मध्ये तिने सोनोग्राफी करताना टिपलेल्या क्षणाचा फोटो शेअर केला आहे.
”आमचं बाळ लवकरच येत आहे” असं कॅप्शन देत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. सोशल मीडियावर वर आलिया आणि रणबीर वर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आलियाने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये तिच्यासोबत रणबीर कपूर  दिसत आहे. अल्ट्रासाऊंड करतानाचा हा फोटो तिने पोस्ट केला आहे. फोटोत आलिया स्क्रीनकडे आनंदाने पाहताना दिसत आहे. रणबीर तिच्याजवळच बेडच्या बाजूला बसलेला आहे. बॉलिवूडमधील सेलिब्रिटींसह चाहते सुद्धा या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या दोन महिन्यानंतर प्रेग्नेंसीची माहिती मिळताच चाहत्यांना सुखद धक्का मिळाला आहे.
रणबीरची बहीण रिधिमा कपूर सहानी, आलियाची आई सोनी राजदान, अभिनेत्री परिणीती चोप्रा, प्रियांका चोप्रा, करण जोहर, टायगर श्रॉफ, वाणी कपूर, रकुल प्रीत सिंग, मौनी रॉय यांसारख्या सेलिब्रिटींनी कमेंट करत आलिया-रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्टने 14 एप्रिल रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या ‘वास्तू’ बंगल्यावर लग्नगाठ बांधली.
आलिया ने अनेक चित्रपटात काम केले असून तिच्या अनेक भूमिका चर्चेत ठरल्या आहेत. आता आलिया आई झाल्यावर पुन्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण करेल का हा प्रश्न अनेक चाहत्यांना आला आहे. तिच्या गंगुबाई काठियावडी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. तिचा अभिनय पाहून अनेक कलाकारांनी तसेच चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. आलिया भट्ट लवकरच रणबीर कपूर सोबत ब्रम्हास्त्र सिनेमात दिसणार आहे.

Latest Posts

Don't Miss