spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नात आलिया-रणबीरचा डान्स ,तयारी सुरु

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.गेल्या वर्षी या दोघांचा साखरपुडा पार पडला.काही दिवसांपूर्वी या दोघांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांचे एक निमंत्रण पत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या निमंत्रण पत्रिकेत अनंत अंबानींचे प्री वेडिंग फंक्शन १ मार्च २०२४ पासून सुरू होणार असून ते ८ मार्च २०२४ पर्यंत असतील असे नमूद केलेले. या कार्यक्रमात अनेक बहारदार नृत्यही सादर केले जातील ज्यांचा तयारी जोरदार सुरु आहे. या सरावासाठी बॉलिवूडचे लाडके कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर खास जामनगरला पोहचल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

मुकेश अंबानी यांचं मूळ गावी जामनगरमध्ये अनंत आणि राधिका यांचं प्री-वेडिंग फंक्शन्स पार पडणार आहे. अनंत आणि राधिकाच्या लग्नाची पत्रिकेत त्याबाबत माहिती दिली गेली आहे. अनंत आणि राधिकाचे प्री-वेडिंग कार्ड खास आहे कारण त्यामध्ये तुम्हाला पृथ्वीवर राहणारे प्राणी आणि वनस्पतींची सुंदर झलक पाहायला मिळणार आहे. या कार्डमध्ये आणखी एक खास गोष्ट दिसली आणि ती म्हणजे नीता आणि मुकेश अंबानी यांचे प्रेम जे त्यांनी हाताने लिहिलेल्या चिठ्ठीतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

 एका फॅन पेजवर एक व्हिडिओ आला,या व्हिडिओमध्ये आकाश अंबानी,रणबीर कपूर आणि आलिया भट्ट दिसत आहेत.. हा व्हिडिओ अंबानींच्या जामनगर फार्महाऊसमधील आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग डान्स प्रॅक्टिससाठी बॉलिवूड कपल तिथे पोहचले होते.

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनीही अनंत व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग डान्स प्रॅक्टिसला हजेरी लावली होती. अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग डान्स प्रॅक्टिससाठी आलेल्या पाहुण्यांसाठी खास व्यवस्थाही केलेली. अंबानींच्या फॅन पेजवर शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये पाहुण्यांसाठी तयार केलेल्या गुजराती चाट आणि स्नॅक्सची झलक दिसली.दरम्यान या वर्षातलं सगळ्यात महागडं आणि भव्य-दिव्य असा हा विवाहसोहळा असणार आहे.

हे ही वाचा:

ED च्या नावावर वसुली करणारा महायुतीतील व्यक्ती कोण?, काँग्रेस

प्रेम व्यक्त करताना देणाऱ्या गुलाबाच्या प्रत्येक रंगाचा आहे वेगळा अर्थ,जाणुन घ्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss