Alka Kubal Birthday: ‘माहेरची साडी’ फेम अलका कुबल यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया चित्रपटसृष्टीतील खास प्रवास… 

१९९१ साली प्रदर्शित झालेला 'माहेरची साडी' या चित्रपटाचा उल्लेख हा आवर्जून केला जातो. अलका कुबल यांचा 'माहेरची साडी' या चित्रपटाने त्याकाळी चक्क 'शोले' या चित्रपटाचे देखील रेकॉर्ड ब्रेक केले होते.

Alka Kubal Birthday: ‘माहेरची साडी’ फेम अलका कुबल यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया चित्रपटसृष्टीतील खास प्रवास… 

मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून अलका कुबल (Alka Kubal) यांचा उल्लेख केला जातो. ९०च्या दशकातील मराठी चित्रपटांची चर्चा सुरु झाली की, त्यात १९९१ साली प्रदर्शित झालेला ‘माहेरची साडी’ या चित्रपटाचा उल्लेख हा आवर्जून केला जातो. अलका कुबल यांचा ‘माहेरची साडी’ या चित्रपटाने त्याकाळी चक्क ‘शोले’ या चित्रपटाचे देखील रेकॉर्ड ब्रेक केले होते. ‘शोले’ चित्रपटाला टक्कर देणाऱ्या या चित्रपटात अभिनेत्री अलका कुबल मुख्य भूमिकेत प्रेक्षकांसमोर झळकल्या होत्या. या प्रसिद्ध अभिनेत्रीचा आज (दि. २३ सप्टेंबर) रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांचा चित्रपटसृष्टीतील खास प्रवास… 

अलक कुबल यांनी रंगभूमीवरून आपल्या अभिनय क्षेत्राची सुरुवात केली होती. अवघ्या वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा केला होता. त्यांनी ‘सम्राट’ या नाटकात दत्ता भट आणि शांता चौगुले यांच्यासोबत काम केले. या नाटकाचे जवळपास २५० प्रयोग पार पडले. यानंतर त्यांनी यशवंत दत्त यांच्या ‘वेडा वृंदावन’ या नाटकातही काम केले. त्यांच्या घरी मनोरंजन विश्वाची कला उपजतच होती. अलका कुबल दहावीत असताना नसीरुद्दीन शाह आणि स्मिता पाटील यांच्या ‘चक्र’ या हिंदी चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. या चित्रपटात काम करण्यासाठी त्यांनी आईकडे हट्ट धरला. मी सेटवर अभ्यास करेन असं सांगून त्यांनी चित्रपटात संधी मिळवली. अलका कुबल यांची स्मिता पाटील आवडती अभिनेत्री आहे. स्मिता पाटीलसोबत काम करत त्यांच्या अभिनयाची सुरुवात झाली.

अलका कुबल यांचे ‘माहेरची साडी’ या प्रसिद्ध चित्रपटासोबतच अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले. जसे की, ‘लेक चालली सासरला’, ‘वाहिनीची माया’, ‘आई तुझा आशीर्वाद’ आणि ‘अग्निपरीक्षा’ असे अनेक चित्रपट सुपरहिट झाले. अलका कुबलचे ९०च्या दशकातील बहुतेक चित्रपट स्त्रियांच्या अपमानावर आणि देवाच्या भक्तीवर आधारित होते. त्यांचा अलिकडील चित्रपट ‘धुरळा’ हा देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तसेच त्यांनी मराठी टीव्ही शो ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत काळूबाईची भूमिका साकारली होती. अशा या एव्हरग्रीन अभिनेत्री अलका कुबल यांना सर्व प्रेक्षकांकडून वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा !

 

Bigg Boss Marathi Season 5: Sangram Chougule पोस्ट करत म्हणाला, घरातून बाहेर जावं लागलं पण….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

 

Exit mobile version