spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

All We Imagine as Light : ‘ऑल वी इमॅजिन एज लाइट’ या चित्रपटाने; ग्रँड प्रिक्स जिंकून भारताचा अभिमान वाढवला…

All We Imagine as Light : पायल कपाडियाचा ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ हा चित्रपट या वर्षीच्या कान्स चित्रपट महोत्सव (Cannes Film Festival) स्पर्धेत निवडला गेला होता . प्रतिष्ठित पाल्मे डी’ओर पुरस्कारासाठी भारतीय चित्रपट ३० वर्षांमध्ये पहिल्यांदाच स्पर्धा करत आहे. कान्स चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची निवड ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी (Oscar Awards Ceremony) करण्यात आली आहे. परंतु हा चित्रपट भारताचे प्रतिनिधित्व करणार नाही. तर फ्रान्स देशाची अधिकृत प्रवेशिका म्हणून हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पायल कपाडिया (Payal Kapadia ) यांनी केले असून मराठमोळी अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) यांची या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

पायल कपाडिया ही कान्स चित्रपट महोत्सवात ग्रँड प्रिक्स पारितोषिक जिंकणारी पहिली भारतीय चित्रपट निर्माती बनली आहे. अमेरिकन अभिनेता व्हायोला डेव्हिस यांच्या हस्ते पायल कपाडियाला ग्रँड प्रिक्स पुरस्कार देण्यात आला. पायलने FTII म्हणजेच ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'(Film and Television Institute of India ) या प्रतिष्ठित संस्थेतून तिचं चित्रपट निर्मितीचे शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यामुळे हा काळ फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या स्मरणात राहिल असा ठरला. तिच्या शैक्षणिक काळादरम्यान पायल आणि इतर काही विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्या कारणामुळे पुणे पोलिसांत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पायलच्या कान्स चित्रपट महोत्सवातील यशानंतर तिच्यावरील हा खटला मागे घेण्यासाठीचे आवाहनही अनेक लोकांनी केले होते.

पारितोषिक स्वीकारताना पायल कपाडिया म्हणाली की, ”कानी कुसरुती , दिव्या प्रभा , छाया कदम आणि हृधू हारून यांचे मी आभार मानते. त्यांच्याशिवाय चित्रपट शक्य झाला नसता.” या चित्रपटात मुंबई राहणाऱ्या दोन परिचारिकांची गोष्ट आहे. यावेळी कान्स चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपटांची जादू दिसली.

महायुतीत शिंदे गट आणि अजित पवार गट दोघेही आश्रित, भाजपचे तुकडे त्यांना स्वीकारावे लागतील: Sanjay Raut

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss