Amitabh Bachchan Birthday: ‘बिग बी’ यांच्या वाढदिवसानिम्मित चाहत्यांचा ‘जलसा’ बाहेर जल्लोष

बॉलिवूडचे सुपर स्टार अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. याच निमित्ताने त्यांचे चाहते देखील जल्लोष करताना दिसले आहेत.

Amitabh Bachchan Birthday: ‘बिग बी’ यांच्या वाढदिवसानिम्मित चाहत्यांचा ‘जलसा’ बाहेर जल्लोष

Amitabh Bachchan Birthday: बॉलिवूडचे सुपर स्टार अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. याच निमित्ताने त्यांचे चाहते देखील जल्लोष करताना दिसले आहेत. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवस (Amitabh Bachchan Birthday) निमित्ताने मध्यरात्री १२ च्या सुमारास अमिताभ बच्चन यांच्या जुहू इथल्या ‘जलसा’ निवासस्थाना बाहेर मोठ्या संख्येमध्ये चाहत्यांची गर्दी जमली होती. यावेळी अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांकडून केक कटिंग करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

आज त्यांच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी आपल्या चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी बिग बी अमिताभ बच्चन स्वतः जलसा बंगल्याबाहेर आले होते. अमिताभ बच्चन मध्यरात्रीनंतर त्यांच्या ‘जलसा’ निवासस्थानातून बाहेर आले होते. या ठिकाणी मोठ्या संख्येने चाहते जमले होते. अमिताभ बच्चनयांनी हात हलवून सर्वांचे स्वागत केले, चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि काही वेळाने पुन्हा घरात गेले. यावेळी त्यांचे चाहते खूप आनंदी आणि उत्साही दिसत होते. मध्यरात्री आपल्या लाडक्या अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आणि त्यांना प्रत्यक्ष समोर पाहताना चाहते चांगलेच आनंदात आणि उत्साहात दिसत होते. याप्रसंगाचा एक व्हिडिओ देखील सोशल मिडीयावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. तसेच अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियामार्फत देखील चाहत्यांनी अनेक शुभेच्छा दिल्या आहे.

हे ही वाचा :

सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये, उच्च संस्थांमध्ये हिंदीचा वापर बंधनकारक करा, अमित शाह यांची समितीला शिफारस

चिन्ह आणि नावावर शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि भारत गोगावले यांची प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version