Amitabh Bachchan यांचे ‘ते’ ट्विट चर्चेत, चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

बॉलीवूडचे Big B म्हणून ओळखले जाणारे महानायक अमिताभ बच्चन यांनी वयाची ऐंशी ओलांडली तरी अजूनही सिनेसृष्टीतील त्यांची जागा कोणीही घेतलेली नाही.

Amitabh Bachchan यांचे ‘ते’ ट्विट चर्चेत, चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

बॉलीवूडचे Big B म्हणून ओळखले जाणारे महानायक अमिताभ बच्चन यांनी वयाची ऐंशी ओलांडली तरी अजूनही सिनेसृष्टीतील त्यांची जागा कोणीही घेतलेली नाही. लवकरच ते बहुचर्चित Kalki 2898 AD या चित्रपटात प्रेक्षकांना दिसून येणार आहेत. तसेच त्यांचा प्रसिद्ध शो कौन बनेगा करोडपतीही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजूनही सिनेसृष्टीत आपला पाय रोवून बसलेले अमिताभ बच्चन हे ट्विटर, फेसबुक आणि इतर सोशल मिडीया अकाऊंट्स स्वतःच सांभाळत असतात. अमिताभ बच्चन सहसा आपल्या वक्तव्यामुळे वादात सापडत नाहीत. मात्र आता अमिताभ बच्चन यांचे एक जुने ट्विट खूप व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी महिलांच्या इनरवेयरवर भाष्य केले आहे.

अमिताभ बच्चन यांचे व्हायरल झालेले ट्विट हे २०१० सालचे आहे, ज्यात त्यांनी एक प्रश्न विचारला होता. त्यांनी ट्विट केले होते की, इंग्रजी भाषेत ब्रा एकवचनी आणि पँटी बहुवचन का आहेत? या त्यांच्या जुन्या ट्विटमुळे अमिताभ बच्चन यांना आता ट्रोलींगला सामोरे जावे लागत आहे. अमिताभ बच्चनच्या या ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना एका यूजरने लिहिले की, ‘आफ्टर ऑल कोणीतरी महत्त्वाचे प्रश्न विचारत आहे.’ तर दुसऱ्या युजरने लिहिले, ‘चांगला प्रश्न बच्चन सर, केबीसीच्या पुढच्या सीझनमध्ये विचारा.’ असे लिहिले आहे. याशिवाय ट्रोल करताना एकाने विचारले,’हे तुमच्याकडून अपेक्षित नव्हते.’ अशाप्रकारे अमिताभ बच्चन यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.

सोशल मीडियावरील याच ट्विटवर काही जण अमिताभ बच्चन यांना पाठिंबादेखील करत आहेत. चाहत्यांचे म्हणणे आहे की, प्रश्न इंग्रजी व्याकरणाचा आहे, त्यांनी उदाहरण जरी असे दिले असले तरीही हा प्रश्न योग्य आहे. दरम्यान Big B अमिताभ बच्चन KBC व्यतिरिक्त आगामी Kalki 2898 AD चित्रपटाची तयारी करत आहेत. या चित्रपटामध्ये त्यांच्याबरोबर प्रभास आणि दीपिका पदुकोण दिसून येणार आहेत.

हे ही वाचा:

गृहमंत्री अमित शाह यांनी केली पायाभरणी

IRCTC सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे तिकीट आरक्षण यंत्रणा कोलमडली

Dream Girl 2 चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version