अमितराज आणि प्रियांका बर्वे यांची नवी इनिंग, ’सुपरस्टार सिंगर’ मध्ये दिसणार परिक्षकांच्या भूमिकेत

छोट्या पडद्यावरील ‘सुपरस्टार सिंगर’ हा सोनी मराठीवरील नवा कार्यक्रम लवकरच सुरु होणार आहे. या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून याचे परीक्षक कोण असणार.?

अमितराज आणि प्रियांका बर्वे यांची नवी इनिंग, ’सुपरस्टार सिंगर’ मध्ये दिसणार परिक्षकांच्या भूमिकेत

छोट्या पडद्यावरील ‘सुपरस्टार सिंगर’ हा सोनी मराठीवरील नवा कार्यक्रम लवकरच सुरु होणार आहे. या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून याचे परीक्षक कोण असणार.? याची उत्सुकता लागून राहिली होती. आपल्या सुमधुर आवाजाने मंत्रमुग्ध करणारी प्रियांका बर्वे आणि आपल्या संगीताच्या जादूने रसिकांची मने जिंकणारे अमितराज या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याआधी चित्रपटातील गाण्यांच्या माध्यमातून आणि वेगवगेळ्या कार्यक्रमात या दोघांच्या गीतसंगीताची मेजवानी रसिकांनी अनुभवली आहे. या कार्यक्रमासाठी ऑनलाईन ऑडिशन्स सुरू झाल्या असून सोनी लिव्ह या अॅपवर जाऊन इच्छुक स्पर्धकांनी आपले ऑडिशन व्हिडीओ पाठवायचे आहेत. २४ ऑगस्ट ही ऑडिशन पाठवण्याची शेवटची तारीख असणार आहे. आता ऑडिशन प्रक्रिया सुरू झालेले असून, लवकरच निवडलेले स्पर्धक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

स्वरांच्या दुनियातील उद्याचा आवाज सोनी मराठी वाहिनीच्या माध्यमातून रसिकांना ऐकायला मिळणार आहे. अमितराज आणि प्रियांका बर्वे आता महाराष्ट्रासाठी हा आवाज शोधणार रसिकांसाठी ही उत्सुकतेची बाब आहे. या नव्या शो विषयी चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रतिभावान आणि होतकरू गायक व संगीतकारांसाठी ‘सुपरस्टार सिंगर’ ने एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आणि यासाठी परीक्षक म्हणून आमची झालेली निवड खूपच आनंददायी आहे. इतक्या वर्षात संगीत क्षेत्रातील आमचे अनुभव आणि आम्ही जे काही शिकलोय ते मी या नव्या स्पर्धकांसोबत शेअर करण्यासाठी आम्ही आतुर आहोत.

विशेष म्हणजे तुमच्या गाण्याच्या प्रतिभेला हवा असेल वाव तर आपल्या सुरेल आवाजातील ऑडिशन्स जरूर पाठवा. ‘सुपरस्टार सिंगर’ हा हिंदी रिअॅलिटी कार्यक्रम विलक्षण लोकप्रिय झाल्यामुळे याच्या मराठी पर्वाची देखील तितकीच उत्सुकता निर्माण झाली आहे. आपल्या घरात असेल असा उद्याचा आवाज तर त्यांना ही लगेच सांगा ऑडिशन्स द्यायला. २४ ऑगस्ट पर्यंत तुम्ही या ऑडिशन्स पाठवू शकता.

हे ही वाचा:

“त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे”; Shivasena UBT गटाच्या नेत्याचे Congressच्या नेत्यावर टीकास्त्र

“निवडणूक आयोग हे राजकारण्यांच्या हातचं हत्यार आणि बाहुलं बनणार असेल तर देशातील संविधान धोक्यातच आहे” – Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version