Amruta Deshmukh-Prasad Jawade यांनी दिली प्रेमाची कबुली, ‘या’ तारखेला करणार लग्न

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे हे दोघेही बिग बॉस सीजन ४ (Bigg Boss Season 4) मध्ये आले होते. बिग बॉस हा एक रिऍलिटी शो (reality show) असून या शो मध्ये अमृता आणि प्रसादची चांगलीच जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती.

Amruta Deshmukh-Prasad Jawade यांनी दिली प्रेमाची कबुली, ‘या’ तारखेला करणार लग्न

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे हे दोघेही बिग बॉस सीजन ४ (Bigg Boss Season 4) मध्ये आले होते. बिग बॉस हा एक रिऍलिटी शो (reality show) असून या शो मध्ये अमृता आणि प्रसादची चांगलीच जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. मात्र त्यांच्यात मैत्रीहूनही काही अधिक आहे का ?असा प्रश्न अनेकांना पडायचा. याच प्रश्नाचे उत्तर देत दोघांनीही नुकतेच इंस्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट शेअर करत आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.

बिग बॉस मराठी ४ नंतर प्रसाद जवादे चर्चेत आहे. प्रसाद आणि अमृता देशमुख यांच्या रिलेशनशिपची सोशल मीडियावर बरीच चर्चा होती .आता त्यातच दोघांनीही त्याच्या रिलेशनशिपबद्दल चाहत्यांना मोठी बातमी दिली आहे. प्रसादच्या फॅन्ससाठी ही मोठी खुशखबर आहे. त्याने याबाबत पोस्ट शेयर करताना सांगतिले की, ते लवकरच लग्न करणार आहेत. त्यांनी रोमँटिक फोटो शेयर केले आहेत. या फोटोत दोघेही त्यांची अंगठी फ्लाँट करताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले आहे की, ‘आमचा साखरपुडा झाला आहे, आम्ही आता अधिकृतपणे एकमेकांसोबत कायमचे नात्यात बांधले गेलो आहोत, आमच्या आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही समस्येला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत’.

अमृता आणि प्रसाद लवकरच लग्न करणार असून त्यांनी या पोस्टसोबतच त्यांच्या लग्नाची तारीखही प्रेक्षांसोबत जाहीर केली आहे. येत्या १८ नोव्हेंबरला दोघेही लग्नबंधनात अडकणार आहे. बिग बॉसनंतर दोघही अनेकदा बऱ्याच इवेंट्समध्ये (events) एकत्र दिसून आले. चाहत्यांना त्यांची ही जोडी फार आवडते आणि त्यामुळेच आता या गोड बातमीने चाहते फार खुश आहेत. त्याच्या या पोस्टवर अनेक चाहते कंमेंट्स करत त्यांचे अभिनंदन करत आहेत. दरम्यान प्रसाद सध्या कलर्स मराठीवरील काव्यांजली या मालिकेत झळकत आहे.

हे ही वाचा:

मुंबईसह मुंबई उपनगरात जोरदार पावसाची हजेरी, मध्य रेल्वेची वाहतूक उशिरा

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक लागले जोमाने तयारीला

BMC कथित कोविड घोटाळा प्रकरणात आता SIT पथक ऍक्शनमोडमध्ये

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version