अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे रिलीज, काही तासांतच लाखो व्हयूज

अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे रिलीज, काही तासांतच लाखो व्हयूज

मराठी गायिका अमृता फडणवीस (Marathi singer Amrita Fadnavis) यांनी या आधी शिव तांडव स्तोत्रम (Shiva Tandava Stotram), मोरया रे (Moray Ray), वो तेरे प्यार का गम (Woh tere pyaar ka gam) आणि तेरी बन जाऊंगी अश्या अनेक गाण्यांमधून सुरेल आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली. काल ५ जानेवारी रोजी, अमृता यांनी त्यांच्या आगामी मूड बनेया गाण्याच्या टीझरने चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. हे गाणं कधी रिलीज होणार याची प्रेक्षक वाट पाहत असतानाच त्यांनी ‘वर्षातील सर्वात मोठे बॅचलोरेट अँथम’ (Bachelorette Anthem) असल्याचा दावा केला आहे. आता, अखेर गायिकेने त्यांचं नवं गाणं सोशल मीडियावर (Social media) शेअर करत चाहत्यांना एक संगीतमय प्रवास घडवला.

टी-सीरीजचे (T-Series) ‘मूड बना लिया’ हे गाणे यूट्यूबवर रिलीज करण्यात आले आहे. मीट ब्रदर्ससोबत अमृता फडणवीस यांनीही गाण्यांना आवाज दिला आहे. या गाण्याला काही तासांतच लाखो व्ह्यूज (Millions of views) मिळाले आहेत. या गाण्यावर प्रतिक्रिया देताना एका युजरने म्हटले की, ‘मी हे गाणे ऐकून थांबू शकत नाही, ते खरोखरच छान आहे’, तर दुसरा म्हणाला, ‘त्याचा आवाज खूप छान आहे.’ याशिवाय अनेक यूजर्स अमृताच्या डान्स मूव्ह्सचे कौतुक करत आहेत.

हे ही वाचा:

शरीरासह मनाचे आरोग्य सांभाळण्यासाठी ‘ही’ योगासने नक्की करून बघा

रुपाली चाकणकरांच्या नोटिसवर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version