Happy Birthday Salman Khan एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये घेणारा सलमान आजही १ बीएच फ्लॅटमध्ये राहतो?

Happy Birthday Salman Khan   एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये घेणारा सलमान आजही १ बीएच फ्लॅटमध्ये राहतो?

Happy Birthday Salman Khan : बॉलीवूडमधील (bollywood) दिग्गज कलारांमध्ये भाईजान सलमान खान (Salman Khan) या कलाकाराचे त्याच नाव येत. सलमान खानचा एक वेगळा चाहता वर्ग (fan club) आहे. बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खान आज (Salman Khan Birthday) वाढदिवस आहे. सलमान एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये घेतो. भारतातील श्रीमंत कलाकारांमध्ये त्याच नाव येते. आज बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त पैसे घेणाऱ्या कलाकारांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. पण असे असूनही सलमान कोणत्याही मोठ्या बंगल्यात न राहाता वांद्रे येथील गॅलेक्सी अर्पाटमेंटमधील एका फ्लॅटमध्ये राहातो. यामागचं कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सलमान बंगल्यात न राहात फ्लॅटमध्ये का राहातो याविषयी त्यानेच एका चॅट शो मध्ये सांगितले होते. तसेच तो म्हणाला होता, ‘माझे आई-वडील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये माझ्याच वरच्या मजल्यावर राहातात. त्यामुळे एखाद्या मोठ्या अलिशान बंगल्यापेक्षा हा फ्लॅट मला प्रिय आहे. मी लहानपणापासून याठिकाणी राहिलो आहे’. सलमान आणि गॅलेक्सी अपार्टमेंटच नाते खूपच जवळचे आहे. त्याच बालपण या घरात गेलं आहे.हे घर त्याला खूप प्रिय आहे. जणू ती त्याची एक ओळख आहे.

सलमान खानचे गॅलेक्सीमधील घर छोटे असले तरी ते शानदार आहे. या अर्पाटमेंटमध्ये त्यांची दोन घरं असून एक घर ग्राऊंड फ्लोअरवर तर दुसरे फर्स्ट फ्लोअरवर आहे. सलमानचे आई वडील सलीम खान आणि सलमा खान पहिल्या मजल्यावर राहातात तर सलमान ग्राऊंड फ्लोअरवर राहातो. जनसत्तानुसार, सलमानचे घर हे वन बीएचके असून यात एक छोटेसे किचन देखील आहे. हा फ्लॅट एल शेप मध्ये असून यातील बेडरूम १७० ते १९० सक्वेअर फूट इतकेच आहे.

अश्या सर्वांच्या लाडक्या फॅमिली मॅन चा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाचा चा केक कट करत, त्याने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत . येणार वर्ष सलमान खानला ब्लॉक ब्लास्टर जाणार आहे. कारण त्याचे आगामी चित्रपट टायगर ३ (tiger), किसीका भाई किसीकि जान ( kisi ka bhai kisiki), वेड (ved), पठान (pathan )नववर्षात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहेत .

हे ही वाचा : 

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आज राज्य सरकार मांडणार ठराव

Happy Brithday Salman Khan तुम्हाला सलमान खानच्या लग्नाचे कारण माहित आहे का ? घ्या जाणून

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version