Thursday, July 4, 2024

Latest Posts

अनंत भाई अंबानींचा शाही सामूहिक विवाह सोहळा, सोहळा समाज प्रेमाचा…

नुकत्याच झालेल्या अनंत भाई अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहपूर्व सोहळ्याची चर्चा देशभर झाली आहे. जामनगर मधील अद्भुत विवाह सोहळा, त्यानंतर परदेशात क्रूज मध्ये झालेला पूर्व विवाह सोहळा, यांनी देशाचे नाही तर जगाचे लक्ष वेधले होते.

नुकत्याच झालेल्या अनंत भाई अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहपूर्व सोहळ्याची चर्चा देशभर झाली आहे. जामनगर मधील अद्भुत विवाह सोहळा, त्यानंतर परदेशात क्रूज मध्ये झालेला पूर्व विवाह सोहळा, यांनी देशाचे नाही तर जगाचे लक्ष वेधले होते. अंबानी कुटुंब केवळ श्रीमंत म्हणून नाही तर त्यांच्या दानधर्मासाठी तसेच समाज उपयोगी कामासाठी सुद्धा चर्चित असतात. त्यामुळेच आता चर्चा आहे ती अंबानी कुटुंबियांनी घडवून आणलेल्या एका आगळ्यावेगळ्या सामूहिक विवाह सोहळ्याची, सुरुवातीला स्वामी विवेकानंद ज्ञान मंदिर पालघर येथे आयोजित हा सामूहिक विवाह सोहळा नंतर रिलायन्स कॉर्पोरेट पार्क ठाणे येथे स्थानांतरीत करण्यात आला.

आर्थिक सुबत्तता नसलेल्या दांपत्याची जबाबदारी घेऊन, त्यांचा थाटामाटात लग्न समारंभ अंबानी कुटुंबियांकडून करण्यात आला. अतिशय आलिशान मंडप भोजन व्यवस्था हे बघून नवविवाहित दांपत्य आणि त्यांचे कुटुंबीय भारावून गेले. या सामूहिक लग्न समारंभामुळे अनंत भाई अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्याची सुरुवात झाली आहे. या सामूहिक विवाह सोहळासाठी ५० आर्थिक दुर्बल दांपत्यांना पालघर वरतून या विशेष सोहळ्यासाठीस्थानांतरित करून, शंभर किलोमीटर दूर ठाणे येथे अविस्मरणीय सोहळा पार पडला. साधारणतः ८०० लोकांमध्ये पार पडला या सोहळ्यात त्यांचे कुटुंबीय, समाजातील प्रतिष्ठित लोक, समाजसेवक इत्यादी उपस्थित होते.

 

अंबानी कुटुंब नेहमीच “मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे” या एका विचारावरती काम करत असते आणि हीच त्यांच्या कुटुंबाची परंपरा आहे.या सामूहिक विवाह सोहळ्यात श्रीमती नीता अंबानी आणि श्री मुकेश अंबानी सुद्धा उपस्थित होते. यामुळे या विवाह सोहळ्यात अजूनच चार चांद लागल्याचे सांगितलं जाते. या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये प्रत्येक दाम्पत्यांला सोन्याची आभूषण आहे त्यात मंगळसूत्र अंगठी आणि नथ ही भेट म्हणून देण्यात आली. अंबानी कुटुंबियांचं या सामूहिक विवाह सोहळ्याच्या नियोजनानंतर सर्व स्तरातून प्रचंड कौतुक होत आहे .

हे ही वाचा:

‘तुमच्या खुर्चीवर दोन लोक बसलेत…’ Rahul Gandhi यांची लोकसभा अध्यक्ष Om Birla यांच्यावर टीका

राहुल गांधींनी संसदेत भगवान शिवाचा फोटो का दाखवला?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss