spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

एका व्यक्तीनं मला कॉम्प्रमाइज करायला…अंकिताने सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव

अभिनेत्री अंकिता लोखंडे बिग बॉस-17 या शोमध्ये पती विकी जैनसोबत सहभागी झाली होती.त्यानंतर ती बिग बॉसच्या घरामुळे चांगलीच चर्चेत आली.

अभिनेत्री अंकिता लोखंडे बिग बॉस-17 या शोमध्ये पती विकी जैनसोबत सहभागी झाली होती.त्यानंतर ती बिग बॉसच्या घरामुळे चांगलीच चर्चेत आली.अंकिता या शो मध्ये टॉप ४ स्पर्धकांपैकी एक होती.याचदरम्यान बिग बॉसच्या घरात तिने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला.सुशांत सिंह राजपुतच्या आठवणींना देखील अंकितानं वेळोवेळी बिग बॉसच्या घरात उजाळा दिला. अंकिता ही तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच बोलत असते.एका मुलाखतीत अंकितानं तिला आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल सांगितलं.

अंकिता लोखंडेनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, “खूप वर्षांपूर्वी मला एका साऊथ चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. तेव्हा एका व्यक्तीनं मला एका रुममध्ये बोलवलं होतं. त्या रुममध्ये मी एकटीच होते. मी तेव्हा 19-20 वर्षाची होती. तिथे आलेल्या एका व्यक्तीनं मला कॉम्प्रमाइजबद्दल सांगितलं. मी त्यांना विचारलं की, मला कोणत्या प्रकारचं कॉम्प्रमाइज करावं लागेल? मला पार्टीला जावं लागले की डिनरला जावं लागेल. माझ्यासोबत बोलणारी व्यक्ती मला म्हणाली की, तुला निर्मात्यासोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील. तेव्हा मी त्याच्यावर खूप चिडले. नंतर मी तिथून निघून गेले.”

“मला वाटतं, तुमच्या चित्रपटाच्या निर्मात्याला एका अतिशय हुशार अभिनेत्रीसोबत काम करायचं नाही. तर त्याला फक्त तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत, असं त्या व्यक्तीला म्हणून मी तिथून निघून गेले.”, असंही अंकितानं मुलाखतीत सांगितलं.  मग त्यांनी माझी माफी मागितली आणि सिनेमात काम देण्यासाठी प्रयत्न करेन असं म्हणाले. पण, मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की जरी आता तुम्हाला मला घ्यायचं असेल तरीदेखील मला तुमच्याबरोबर काम करण्यात रस नाही.

अंकितानं मुलाखतीत तिला आलेला आणखी एक अनुभव सांगितला. ती म्हणाली,”जेव्हा मी पुन्हा चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा मला एका व्यक्तीला शेकहँड करताना विचित्र वाटले. मला त्या व्यक्तीचे नाव घ्यायचे नाही कारण तो मोठा अभिनेता आहे. मला विचित्र वाटल्यानंतर मी लगेच माझा हात झटकला केला.”अंकिता ही रणदीप हुड्डाच्या एका चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव स्वातंत्र वीर सावरकर असं आहे. हा चित्रपट 22 मार्च 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.प्रेक्षकांना देखील अंकिताच्या नवीन चित्रपटाची प्रतिक्षा आहे. मग त्यांनी माझी माफी मागितली आणि सिनेमात काम देण्यासाठी प्रयत्न करेन असं म्हणाले. पण, मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की जरी आता तुम्हाला मला घ्यायचं असेल तरीदेखील मला तुमच्याबरोबर काम करण्यात रस नाही.

हे ही वाचा:

सीएम केजरीवाल यांना कोर्टाचा धक्का, ईडीच्या अर्जावर १७ फेब्रुवारीपर्यंत हजर राहण्याचे आदेश

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुक्ता-सागर पोहचणार सईच्या शाळेत,तर सावनी रचतेय नवं कारस्थान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss