spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अनुष्का शर्माने विक्रीकराच्या आदेशाविरोधात घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या याचिकेनंतर एका प्रकरणात मुंबई हायकोर्टाने थेट विक्रीकर विभागालाच नोटीस पाठवली आहे. मुंबई हायकोर्टाच्या (Bombay High Court) माध्यमातून अनुष्का शर्माने (Anushka Sharma) विक्रीकर विभागाला (Sales Tax Department) कर वसुलीच्या प्रकरणात विक्रीकर विभागाच्या नोटिसीला आव्हान दिले आहे. महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायद्यांतर्गत २०१२-१३ आणि २०१३-१४ या मूल्यांकन वर्षांसाठी विक्रीकर उपयुक्तांनी दिलेल्या दोन आदेशांना आव्हान देत अभिनेत्री अनुष्का शर्माने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी आता ६ फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. हायकोर्टाने विक्रीकर विभागाला तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. याआधी कोर्टाने फटकारल्यानंतर अनुष्काच्या कर सल्लागाराने केलेली याचिका मागे घेतली होती. त्यानंतर अनुष्का शर्माने पुन्हा एकदा याचिका दाखल केल्यानंतर हायकोर्टाने विक्रीकर विभागाला नोटीस पाठवली आहे.

अनुष्का शर्माने यापूर्वी याच मुद्यावर आपल्या कर सल्लागारामार्फत याचिका दाखल केली होती. मात्र अनुष्का यावर स्वतः याचिका का दाखल करत नाही?, एखाद्या व्यक्तीनं कर सल्लागारामार्फत याचिका दाखल केली, असं आतापर्यंत कधीही घडलेलं नाही. असा प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयानं यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर ती याचिका मागे घेऊन पुन्हा नव्यानं याचिका दाखल करण्याची मुभा देत ती याचिका निकाली काढली होती.

याचिकांमध्ये असे म्हटले आहे की,”व्हिडिओचे कॉपीराइट नेहमीच निर्मात्याकडे राहतात. जो त्याचा मालक असतो. मालांची विक्री आहे हे स्थापित होत नाही तोपर्यंत, विक्री कर आकारला जाऊ शकत नाही,” असं याचिकांमध्ये म्हटले आहे. शर्मा म्हणाले की,”चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला चित्रपटाचा निर्माता किंवा निर्माती म्हणता येणार नाही आणि त्यामुळे चित्रपटाचे कॉपीराइट त्याच्याकडे नाहीत. याचिकाकर्त्याने असे म्हटले आहे की, एखाद्या अभिनेत्याकडे चित्रपटातील कोणतेही कॉपीराइट नसल्यामुळे ते इतर कोणत्याही व्यक्तीला किंवा निर्मात्याला हस्तांतरित/विक्री करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे याचिकांमध्ये म्हटले आहे. जर विक्रीकर विभागानुसार, शर्माने तिच्या परफॉर्मरचे अधिकार हस्तांतरित केले असतील तर तिने असे कोणाला केले हे नमूद केले पाहिजे, असे याचिकांमध्ये म्हटले आहे. “कलाकाराचे हक्क अभिनेत्याच्या हिताचे रक्षण करणे आहेत आणि ते हस्तांतरण किंवा विक्रीसाठी नाहीत,” असे अभिनेत्रीने तिच्या याचिकेत म्हटले आहे.

हे ही वाचा:

‘फैमिली पर आए तो डिस्कशन नहीं एक्शन करते हैं’, कार्तिक आर्यनच्या धमाकेदार चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज

पुण्यातील कोयता गँगचा प्रमुख आरोपी अटकेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss