‘अप्पी आमची कलेक्टर’ झी मराठीच्या नव्या मालिकेचा प्रोमो झाला रिलीज…

झी मराठीने नुकताच आपल्या या नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज केला आहे. तर या मालिकेत अपर्णा माने (अप्पी) या भूमिकेतून नवोदित अभिनेत्री शिवानी नाईक पदार्पण करणार आहे.

‘अप्पी आमची कलेक्टर’ झी मराठीच्या नव्या मालिकेचा प्रोमो झाला रिलीज…

‘अप्पी आमची कलेक्टर’

 

झी मराठी ही वाहिनी नेहमीच विविध विषयांवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असते. हल्लीच्या काळात झी मराठीवर ग्रामीण भागातील विषयांवर आधरीत मालिकांचे बरेच वाढले आहे. मग ती राणा आणि अंजलीबाईंची लव्हस्टोरी सांगणारी तुझ्यात जीव रंगला हि मालिका असुदे किंवा मग एका सामान्य मुलीपासून मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा सुमीचा प्रवास सांगणारी मिसेस मुख्यमंत्री हि मालिका असुदे. झी मराठीने नेहमीच आपल्या मालिकांमधून ग्रामीण भागाच्या विविध छटा लोकांसमोर मांडल्या आहेत आणि ग्रामीण अशाच काही प्रश्नांवर भाष्य करणारी ‘अप्पी आमची कलेक्टर’ हि मालिका झी मराठी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे.

झी मराठीने नुकताच आपल्या या नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज केला आहे. तर या मालिकेत अपर्णा माने (अप्पी) या भूमिकेतून नवोदित अभिनेत्री शिवानी नाईक पदार्पण करणार आहे. या मालिकेची कथा ही अपर्णा माने (अप्पी) हिच्यावर आधरीत असून अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, ही एका ग्रामीण भागातील खेडे गावात राहणारी मुलगी आहे. या गावात कोणत्याही शैक्षणिक सुविधा, कोणतेही मार्गदर्शन नसताना ती तिचे कलेक्टर होण्याचे स्वप्न कसे पूर्ण करते याचा संघर्ष यात पाहायला मिळणार आहे. यादरम्यान येणाऱ्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर ती कशाप्रकारे मात करते हे देखील यात पाहायला मिळणार आहे.

“मी खूप भाग्यवान आहे की मला झी मराठीच्या मंचावर काम करण्याची संधी मिळतेय. एक नवीन जबरदस्त प्रेरणा असणारी आणि एक मोठी संकल्पना उराशी बाळगून अनेक अडचणींवर मात करत आपले ध्येय साध्य करणाऱ्या मुलीची भूमिका मला करायला मिळत आहे. याबद्दल मी खूप आनंदी आहे, अशा शब्दात मालिकेत अपर्णा अर्थातच अप्पी हि भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शिवानी नाईक हिने आनंद व्यक्त केला.

या मालिकेची निर्मिती वज्र प्रोडक्शनने केली आहे. या प्रोडक्शन हाऊसने या आधी झी मराठीवर ‘लागीर झालं जी, देवमाणूस, देवमाणूस २’ या मालिका केल्या आहेत. या तीनही मालिका चांगल्याच गाजल्या होत्या. त्यामुळे या मालिकेबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे. येत्या २२ ऑगस्टपासून ही मालिका झी मराठीवर प्रदर्शित होत आहे.

 

 

Exit mobile version