Apurva Agnihotri Shilpa Baby पोस्ट शेअर करत अपूर्व आणि शिल्पाने सांगितलं लेकीचं नाव, लग्नाच्या १८ वर्षानंतर झाले चिमुकल्या पावल्याचं आगमन

बॉलिवूड अभिनेता अपूर्व अग्निहोत्री (Apurva Agnihotri) आणि अभिनेत्री शिल्पा सकलानी (Shilpa Saklani) हे बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय जोडपं आहे.

Apurva Agnihotri Shilpa Baby पोस्ट शेअर करत अपूर्व आणि शिल्पाने सांगितलं लेकीचं नाव, लग्नाच्या १८ वर्षानंतर झाले चिमुकल्या पावल्याचं आगमन

बॉलिवूड अभिनेता अपूर्व अग्निहोत्री (Apurva Agnihotri) आणि अभिनेत्री शिल्पा सकलानी (Shilpa Saklani) हे बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय जोडपं आहे. ‘परदेस’, ‘प्यार कोई खेल नहीं’ यासांरख्या चित्रपटांतुन आपली ओळख असलेला अभिनेता अपूर्व अग्निहोत्री आणि अभिनेत्री शिल्पा सकलानी हे लोकप्रिय जोडप्यापैकी आहेत. आता लग्नाच्या १८ वर्षानंतर ते आई-बाबा झाले आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

अपूर्व आणि शिल्पाच्या घरी एका गोड परीचे आगमन झाले आहे. अपूर्व अग्निहोत्रीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. अपूर्व अग्निहोत्रीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये हे जोडपं आपल्या लहान बाळाला धरलेले आहे. ते दोघेही तिच्याकडे प्रेमाने पाहत आहे. पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये त्यांची छोटी परी खूपच क्यूट दिसत आहे. शिल्पाने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलाय तर, अपूर्व कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. या जोडप्याचा फॅमिली व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि चाहते त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

अपूर्व अग्निहोत्रीने ‘परदेस’, ‘प्यार कोई खेल नही’ सारख्या सिनेमांत काम केलं आहे. तसेच ‘जस्सी जैसी कोई नही’,’अजीब दास्ता’ या छोट्या पडद्यावरील मालिकांमध्येदेखील त्याने काम केलं आहे. तर दुसरीकडे शिल्पा सकलानी ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’, ‘क्या हादसा क्या हकीकत’,’कुसुम’,’जस्सी जैसी कोई नहीं’,’नच बलिए 1, ‘बिग बॉस 7’ सारख्या कार्यक्रमांत दिसून आली आहे. अपूर्व आणि शिल्पा २४ जून २००४ साली लग्नबंधनात अडकले होते.

हे ही वाचा :

शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून आज पुन्हा एकदा भाजपवर निशाणा

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मुलांसाठी खास कार्यक्रमांचे आयोजन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version