spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘सिंगम ३’ मध्ये अर्जुन कपूर साकारणार खलनायकाची भूमिका, व्हिलन लूक झाला आउट

प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी सध्या त्याच्या आगामी 'सिंघम अगेन'  या चित्रपटासाठी चर्चेत आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी सध्या त्याच्या आगामी ‘सिंघम अगेन’  या चित्रपटासाठी चर्चेत आहे.या चित्रपटाची घोषणा केल्यापासून प्रेक्षक चित्रपटासाठी उस्तुक आहेत. या चित्रपटाची स्टार कास्ट एकदम तगडी आहे.रोहित शेट्टी आपल्या सोशल मीडिया साईडवरुन चित्रपटातील कास्टचे फोटो प्रदर्शित करत आहे. ‘सिंघम अगेन’ मध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार काम करणार आहे. अशताच आता या चित्रपटात अर्जुन कपूरची एन्ट्री झाली आहे. सिंघम अगेन या चित्रपटातील अर्जुनचा लूक रिलीज करण्यात आला आहे. अर्जुनच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.या ‘सिंघम अगेन’मध्ये अर्जुन कपूर  हा खलनायकी भूमिका साकारणार आहे.

अर्जुन कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘सिंघम अगेन’ मधील स्वतःचे दोन फोटो शेअर केले. यातील एका फोटोत रणवीर सिंगही आहे. “सिंघम का खलनायक!,”इंसान गलती करता है और उसे उसकी सजा भी मिलती है…लेकिन अब जो आएगा, वो शैतान है! इंट्रोड्यूसिंग अर्जुन कपूर!’ असे कॅप्शन अर्जुनने दिले. रक्ताने माखलेला चेहरा असलेला अर्जुन कपूरच्या खतरनाक लूकने लक्ष वेधले आहे.तर या लूकला अनेकांनी कमेंट्स आणि लाईकचा वर्षाव केला आहे.

अर्जुनचा फर्स्ट लूक शेअर करताना, चित्रपट निर्माता रोहित शेट्टीने इंस्टाग्रामवर  म्हटले की, जी लोक चुका करतात…त्यांना त्याची शिक्षा मिळते…मात्र, आता जो येणार आहे तो  शैतान आहे… असे रोहित शेट्टीने लिहिले आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा कॉप युनिव्हर्स सिंघम अगेन, फ्रँचायझीमधील पाचवा भाग आणि सिंघम रिटर्न्स चा सिक्वेलसह परत येणार आहे. ‘सिंघम 3’ या  टायटलखाली सप्टेंबर 2017 मध्ये चित्रपटाची घोषणा करण्यात आली आणि डिसेंबर 2022 मध्ये अधिकृत शीर्षकाची घोषणा करण्यात आली.

‘सिंघम अगेन’ ऑगस्ट 2024 मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत. तर अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि टायगर श्रॉफ कॅमिओ भूमिकेत दिसत आहेत.रोहित शेट्टीच्या सिंघमच्या प्रत्येक भागाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे,दरम्यान आता प्रेक्षकांमध्ये सिंघम अगेन या चित्रपटाची उस्तुकत्ता शिगेला पोहचला आहे.

हे ही वाचा: 

‘काही लोक इतिहासातून शिकतात’…शिल्पा शेट्टीनी राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेबाबत नरेंद्र मोदींना लिहेले पत्र

केसांच्या आरोग्यासाठी कॉफीचा ‘या’ पद्धतींनी करा वापर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss