मुन्नाभाई MBBS फेम अर्शद वारसी याने सांगितली त्याच्या आयुष्यातली मोठी खंत

मुन्नाभाई एमबीबीएस (MBBS) हा चित्रपट २००३ साली प्रदर्शित झाला असून या चित्रपटात मुख्य भूमिकेत संजय दत्त आणि अर्शद वारसी यांनी काम केले आहे.

मुन्नाभाई MBBS फेम अर्शद वारसी याने सांगितली त्याच्या आयुष्यातली मोठी खंत

मुन्नाभाई एमबीबीएस (MBBS) हा चित्रपट २००३ साली प्रदर्शित झाला असून या चित्रपटात मुख्य भूमिकेत संजय दत्त आणि अर्शद वारसी यांनी काम केले आहे. मुन्नाभाई एमबीबीएस हा चित्रपट आजही तितकाच प्रसिद्ध आहे. अर्शद वारसी याने या चित्रपटात सर्किटची भूमिका उत्तमरीत्या साकारली आहे. आजही या सिनेमातील सर्किट म्हणून अर्शद सर्वत्र प्रसिद्ध आहे. अर्शदची करिअरची सुरुवात ही डान्सर म्हणून झाली. आज अर्शद वारसी याने आपले बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्वतंत्र नाव प्रस्थापित केले आहे. अर्शदचे बरेच फॅन फॉलोविंग्स (Fan Followings) आहेत. हल्लीच एका मुलाखतीमध्ये अर्शदने मुन्नाभाई एमबीबीएस या सिनेमातील भूमिकेबद्दल स्पष्ट वक्तव्य केले आहे.

एका मुलाखतीत मुन्नाभाई एमबीबीएस या सिनेमामधील स्वतःच्या भूमिकेबद्दल बोलताना अर्शद म्हणाला, सर्किटच्या भूमिकेसाठी अभिनेते मकरंद देशपांडे यांनी सुद्धा नकार दिला होता. मी हा चित्रपट फक्त दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्यासाठी केला. मला खात्री होती सिनेमात काम केल्यानंतर माझं आयुष्य उद्धवस्त होईल. मुन्नाभाई माझा शेवटचा चित्रपट असेल असं मला वाटत होतं. मी जी भूमिका साकारणार होतो ती एका गुंडाची भूमिका होती. पुढे अर्शद म्हणाला, जेव्हा तुम्ही एखादी भूमिका साकारण्यासाठी होकार देता तेव्हा तुम्ही फक्त कागदावर लिहिलेल्या गोष्टी पाहता. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर मला कळालं आणि त्याचे परिणाम मी पाहिले. सिनेमा जरी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला असला तरीही मला काहीही मिळालं नाही. अश्या शब्दात अभिनेत्याने स्पष्ट भूमिका मांडली.

मुन्नाभाई एमबीबीएस हा २००३ साली प्रदर्शित झालेला सिनेमा प्रेक्षकांना प्रचंड आवडला. यामध्ये अभिनेता संजय दत्त याचे करिअर भक्कम झाले. मात्र सर्किटच्या भूमिकेला हवी तितकी लोकप्रियता अथवा काहीही मिळाले नाही अशी खंत अर्शद वारसी कडून करण्यात आली. या चित्रपटाला तब्बल २० वर्ष झाले असून अनेक वर्षानंतर अर्शद वारसी याने ही खंत एका मुलाखतीतून व्यक्त केली. या मुलाखतीनंतर अभिनेता चांगलाच चर्चेत आला आहे. मुन्नाभाई एमबीबीएस हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. आजही या सिनेमातील काही सीन सोशल मीडियावर (socail media) प्रचंड वायरल (Viral) होत आहेत. अर्शद सध्या असुर २ या वेब सिरीजमुळे चर्चेत आहे. असुरच्या पहिल्या सीजनला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून दुसऱ्या भागाची देखील तुफान चर्चा सुरु आहे.

हे ही वाचा:

Sara Ali Khan ने पुन्हा आठवल्या Sushant Singh Rajput सोबतच्या आठवणी

मुंबई, ठाणे ,पालघरसह वसईमध्ये देखील पावसाने लावली हजेरी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version