spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Arun Bali Death : ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

मनोरंजनसृष्टीतुन एक दुःखद बातमी समोर आली आहे. विविध लक्षवेधी भूमिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमठवणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचं निधन झालं आहे.

मनोरंजनसृष्टीतुन एक दुःखद बातमी समोर आली आहे. विविध लक्षवेधी भूमिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमठवणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली (Arun Bali) यांचं निधन (Death) झालं आहे. बाली हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ७९ वर्षांच्या बाली यांनी ‘केदारनाथ’, ‘ ३ इडियट्स’ सारख्य गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

अरुण बाली हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. Myasthenia Gravis या दुर्मिळ आजाराने त्यांना ग्रासलं होतं. या मुळे त्यांच्या प्रकृतीत सतत चढ-उतार सुरु होते. अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. परंतु आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरुण बाली यांच्या निधनाचं वृत्त समोर येताच त्यांच्या चाहत्यांपासून बॉलिवूड कलाकारापर्यंत सर्वजण शोकसागरात बुडाले आहेत. चाहते सतत त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहेत. आणि त्यांना श्रद्धांजली वाहात आहेत.

अरुण बाली यांचा जन्म २३ डिसेंबर १९४२ मध्ये लाहोर, पाकिस्तान येथे झाला होता. बाली यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. फक्त हिंदी चित्रपटांमध्येच नव्हे तर त्यांनी तेलुगू आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम करत आपला ठसा उमठवला आहे. अरुण बाली यांनी ‘३ इडियट्स’, ‘पीके’, ‘रेडी’, ‘बर्फी’, ‘ओह माय गॉड’, ‘केदारनाथ’, ‘जमीन, ‘सौगंध’, ‘जंटलमन’, ‘फूल और अंगारे’, ‘खलनायक’ आणि ‘पानिपत’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. १९८९ मध्ये ‘दूसरा केवल’ मधून त्याने टीव्ही डेब्यू केला. चांकय्या, स्वाभिमान आणि कुमकुम प्यारा सा बंधन यांसारख्या अनेक टीव्ही शोमध्ये तो गेला.अरुण बालीला या वर्षाच्या सुरुवातीला मायस्थेनिया ग्रॅव्हिस या दुर्मिळ न्यूरोमस्क्युलर आजाराचे निदान झाले होते. मज्जातंतू आणि स्नायू यांच्यातील संप्रेषणाच्या बिघाडामुळे, आजाराने त्याच्यावर टोल घेतला आणि तो वारंवार रुग्णालयात आणि बाहेर जात होता.

हे ही वाचा:

NTSE Scheme : राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा योजना स्थगित

राज्यात २५ लाख हेक्टर जमीन… : देवेंद्र फडणवीस

Google Pixel 7 Series Launch: मेगा इव्हेंटमध्ये गूगलने लॉन्च केले Google Pixel 7, Pixel 7 Pro, जाणून घ्या गूगलच्या नव्या सिरिजची किंमत आणि वैशिष्टय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss